OTT : थरकाप उडवणारा सस्पेन्स! दर 5 मिनिटाला बदलतो खुनी; 'हा' सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट ओटीटीवर घालतोय धुमाकूळ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जेव्हा अचानक मागे कोणीतरी असल्याचा भास होतो किंवा कथेतील वळण पाहून अंगावर काटा येतो, तेव्हा समजावं की हा एक अस्सल सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. जर तुम्ही अशाच एका थरारक अनुभवाच्या शोधात असाल, तर एक जबरदस्त चित्रपट सध्या चर्चेत आला आहे.
मुंबई : आजच्या काळात आपण मनोरंजनासाठी अनेक चित्रपट पाहतो, पण काही चित्रपट असे असतात जे केवळ पडद्यावर दिसत नाहीत, तर तुमच्या मनाचा ताबा घेतात. रात्रीच्या शांततेत एकटा चित्रपट पाहताना जेव्हा अचानक मागे कोणीतरी असल्याचा भास होतो किंवा कथेतील वळण पाहून अंगावर काटा येतो, तेव्हा समजावं की हा एक अस्सल सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. जर तुम्ही अशाच एका थरारक अनुभवाच्या शोधात असाल, तर एक जबरदस्त चित्रपट सध्या चर्चेत आला आहे.
आपण बोलत आहोत 'वश लेव्हल 2' (Vash Level 2) या सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलरबद्दल, ज्याने सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 103 मिनिटांच्या या चित्रपटात दर 5 मिनिटाला मडरर बदलतो असं वाटतं आणि शेवटच्या सीनपर्यंत सस्पेन्सचा असा काही माइंड गेम चालतो की तुम्ही थक्क व्हाल.
12 वर्षांनंतरचं तेच भयाण संकट
या चित्रपटाची कथा पहिल्या भागातील ('वश') घटनांनंतर 12 वर्षांनी सुरू होते. अथर्वने आपली मुलगी आर्याला त्या सैतानी शक्तींपासून वाचवलं होतं, पण ती काळी शक्ती कधीच नष्ट झाली नव्हती. आर्या अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही. अचानक शाळेतील मुली छतावरून उड्या मारतात, शहरात हिंसाचार सुरू होतो आणि गाड्या जाळल्या जातात. हे सर्व प्रताप या काळ्या जादूगाराचा भाऊ राजनाथ याचं कारस्थान असतं.
advertisement
चित्रपटाचा क्लायमॅक्स तर इतका भयानक आहे की कमकुवत मन असणाऱ्यांनी तो पाहू नये. यात जीभ कापण्यासारखे दृश्य आहेत जे अंगावर काटा आणल्याशिवाय रहाणार नाही. अथर्व पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासाठी या काळ्या शक्तींविरुद्ध उभा राहतो. शेवटी तो दोन्ही भावांना कैद करून विजय मिळवतो, पण या लढाईत त्याला मिळालेल्या जखमा खूप खोल असतात.
advertisement
या चित्रपटात जानकी बोदीवाला, हितु कनोडिया, मोनल गज्जर आणि हितेन कुमार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः जानकी आणि हितेन कुमार यांचा अभिनय तुम्हाला खिळवून ठेवतो. भारतामध्ये या चित्रपटाने 13.64 कोटींची कमाई केली, तर वर्ल्डवाइड कलेक्शन 13.8 कोटींच्या आसपास होतं.
IMDb रेटिंग: प्रेक्षकांनी याला 10 पैकी 7.3 असं तगडं रेटिंग दिलं आहे.
advertisement
आता घरबसल्या घ्या थराराचा अनुभव
जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर काळजी करण्याचं कारण नाही. 22 ऑक्टोबर 2025 पासून हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही पहिला भाग 'वश' पाहिला असेल, तर हा सीक्वेल तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
थोडक्यात सांगायचं तर, हॉरर आणि थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'वश लेव्हल 2' ही एक 'परफेक्ट चॉईस' आहे. पण लक्षात ठेवा, हा चित्रपट पाहताना लाइट चालू ठेवायला विसरू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 7:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT : थरकाप उडवणारा सस्पेन्स! दर 5 मिनिटाला बदलतो खुनी; 'हा' सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट ओटीटीवर घालतोय धुमाकूळ









