पुण्यातील केशवनगरमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ पाहिल्यावर पुणेकरांमध्ये डासांची दहशत निर्माण झाली. पुण्यामध्ये डासांची पूर्ण फौजच आल्याचं पहायला मिळालं. हे दृश्य कॅमेऱ्यातही कैद करण्यात आलं आहे.
डासांच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीच्या वर संपूर्ण डासांची लाट आल्याचं दृश्य आहे. हे दृश्य फारच भयानक असून कोणीही पाहून घाबरेल. पुण्यातील केशवनगरमधील खराडीजवळील नदीपात्राच्या वर हे दृश्य दिसलं. एवढ्या प्रमाण ही डासांची सेना आहे की आता पुणेकरांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
advertisement
maze.pune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पुणेकरांच्या भरपूर कमेंट त्यावर पहायला मिळत आहेत. डासांच्या फौजेमागे नेमकं काय कारण आहे, अचानक ही लाट कुठून आली याबाबत माहिती समोर आली नाही.
