सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 एप्रिलला मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर, पुढील 24 तासांत मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? विदर्भ स्टाईल बनवा आलू पोंगा, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
नाशिकमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. त्याचबरोबर, पुढील 24 तासांत तेथील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यातील सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. वाढते तापमान आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवस राज्यात दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.





