TRENDING:

पतीला आधी दारू पाजली; मग प्रियकरासोबत मिळून पुण्यातील पत्नीचं धक्कादायक कृत्य, व्हिडिओही बनवला

Last Updated:

दुपारी अडीचच्या सुमारास अमोलच्या पत्नीने त्यांना भोसरीतील घरी बोलावून घेतले होते. तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे (वय ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी मिळून अमोलला दारू पाजली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड : भोसरी येथे एका विवाहितेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीसोबतच धक्कादायक कांड केलं. तिने आपल्या पतीला घरी बोलावून रबरी पाईप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रियकरासोबत मिळून पतीला बेदम मारहाण (प्रतिकात्मक फोटो)
प्रियकरासोबत मिळून पतीला बेदम मारहाण (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे मारहाणीत जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. अमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (२८ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना भोसरीतील घरी बोलावून घेतले होते. तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे (वय ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी मिळून अमोलला दारू पाजली. त्यानंतर किरकोळ वादाचे निमित्त करून दोघांनी अमोलला मारहाण करण्यास सुरुवात केली.

advertisement

प्रियकर अजय नात्रे हा अमोलला पाईपने बेदम मारत असताना, आरोपी पत्नीने पतीचा ओरडतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या क्रूर मारहाणीत अमोलच्या मान, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर जखमी अमोल यांनी मंगळवारी (३१ मार्च) भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भक्ताला हनुमानाने दिला तो आशिर्वाद अन् 400 वर्षांपूर्वी स्थापन झालं 'सुपारी मंदिर', आख्यायिका माहितीये का?
सर्व पहा

भोसरी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच आपल्या पतीसोबत हे धक्कादायक कृत्य केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पतीला आधी दारू पाजली; मग प्रियकरासोबत मिळून पुण्यातील पत्नीचं धक्कादायक कृत्य, व्हिडिओही बनवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल