पुणे : राज्यभरातील अति मुसळधार पावसानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरता दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबाबत राज्यातील पाऊस परिस्थितीचा हा महत्त्वाचा आढावा.
मुंबईसह उपनगरात थोडा उकाडा वाढण्याची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर, डोंबिवली या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी किंवा ऊन अशी स्थिती राहणार आहे. पुढील काही दिवस मुंबईत उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत कमाल 32°C तर किमान 25°C तापमान असेल.
advertisement
पुणे आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट दिला आहे. उद्या पुण्यात कमाल 29°C तर किमान 20°C तापमान असेल.
हवामान माहिती आधारित अचूक पशुधन सल्ला मिळणार, फुले अमृतकाळ ॲप काय आहे? कशी होणार मदत?, VIDEO
विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात पुढील 2 जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल 30°C तर किमान 21°C तापमान असेल.
गणेशोत्सवात करा सुंदर असं डेकोरेशन, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच ठिकाणी मिळतं सर्व साहित्य
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, छ. संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऊन पावसाचा लपंडावही पाहायला मिळत आहे. तर छ. संभाजीनगरमध्ये 30°C कमाल तर 21°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.