हवामान माहिती आधारित अचूक पशुधन सल्ला मिळणार, फुले अमृतकाळ ॲप काय आहे? कशी होणार मदत?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
या ॲपला तापमानाच्या व आर्द्रतेच्या अद्ययावत, इत्यंभूत व अचूक माहितीची आवश्यकता असते. ही गरज भागविण्यासाठी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथे या फुले स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे अचूक पशुधन सल्ला दिला जाणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात फुले स्मार्ट हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने विद्यापीठाच्या स्मार्ट व अचूक शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सहकार्यातून “तापमान आर्द्रता निर्देशांक” आधारित पशुसल्ला देण्यासाठी फुले अमृतकाळ हे ॲप विकसित केले आहे.
advertisement
या ॲपला तापमानाच्या व आर्द्रतेच्या अद्ययावत, इत्यंभूत व अचूक माहितीची आवश्यकता असते. ही गरज भागविण्यासाठी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथे या फुले स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे अचूक पशुधन सल्ला दिला जाणार आहे.
या संशोधन केंद्रांने देशातील पहिले तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशुसल्ला ॲप 'फुले अमृतकाळ' तयार केले आहे. या ॲपमध्ये ओपनसोर्स सॅटॅलाइट वरुन तसेच सेन्सरचा वापर करून तापमान व आर्द्रतेची माहिती घेत जनावरांमध्ये उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण ओळखता येतो. 'फुले अमृतकाळ' ॲप शेतकऱ्यांसाठी प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. मात्र, तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित जनावरातील ताण ओळखण्यासाठी तापमान व आर्द्रते बरोबर वाऱ्याचा वेग व सौर उत्सर्जन हे घटक सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यासाठी फुले स्मार्ट हवामान केंद्राचा उपयोग करुन त्याद्वारे हवामानाच्या विविध परिमाणांच्या मिळणाऱ्या माहिती मिळवून विभागानुसार अचूक हवामान आधारित पशुसल्ला शक्य होणार आहे.
advertisement
फुले स्वयंचलित हवामान केंद्र वातावरणातील विविध घटकांची इत्यंभूत माहिती टिपून प्रक्षेपित करेल. या आधारे फुले अमृतकाळ हे ॲप पशुपालकांना जनावरांना येणारा ताण टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पशुधन व गोठा व्यवस्थापनामध्ये करावयाच्या विविध गोष्टींबद्दल सल्ला पुरवेल.
advertisement
या सौर उर्जेवर चालणाऱ्या फुले स्मार्ट वेदर स्टेशनच्या आधारे हवामानातील तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पर्जन्यमान, सौर उत्सर्जन अशा अनेक परिमाणांची माहिती मिळते. हे फुले स्मार्ट हवामान केंद्र या सर्व हवामानासंदर्भातील परिमाणांची माहिती वायफायच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित फुले अमृतकाळ पशु सल्ला ॲपला पुरविते. याच्या आधारे पशुधन पालकांना पशुधन व्यवस्थापना संदर्भातील अचूक सल्ला पुरविला जातो.
advertisement
महालक्ष्मीचा सण, जालन्यातील आकर्षक कोठ्यांची सर्वत्र चर्चा, 50 वर्षांपासून हिंगोलीतील कारागिरांचा मोठा वाटा, VIDEO
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी असे फुले स्मार्ट हवामान केंद्र प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उभारले जाणे गरजेचे आहे, असे सांगितले. असे फुले स्मार्ट हवामान केंद्र जागोजागी उभारल्याने तापमान व आर्द्रता निर्देशांक आधारित वेळ व ठिकाण निर्धारित अचूक पशुधन व्यवस्थापन सल्ला देणे साध्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 28, 2024 5:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हवामान माहिती आधारित अचूक पशुधन सल्ला मिळणार, फुले अमृतकाळ ॲप काय आहे? कशी होणार मदत?, VIDEO