पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा शेवट
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील रणजीत साळुंखे यांच्या खोलीवर पोलिस भरती परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून विरू संजय काळे आणि आदित्य साळेकर हे दोघे युवक आले होते. हे युवक गेल्या दोन दिवसांपासून त्या खोलीत वास्तव्यास होते. सायंकाळच्या सुमारास विरू काळे हा खोलीत एकटाच असताना त्याने घरातील दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले.
advertisement
मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून विरू संजय काळे (वय 22 वर्षे)राहणारा सातारा याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मृत युवकाचे वडील विजय रामचंद्र काळे (वय 51) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस भरती परीक्षेचा मानसिक ताण किंवा इतर कोणते कारण या आत्महत्येमागे आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
