3 की 4 मार्च, कधी खेळली जाणार रंगाची होळी?
सामान्यतः होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होते. मात्र, 2026 मध्ये खगोलशास्त्रीय आणि धार्मिक कारणांमुळे तारखेत बदल झाला आहे. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम लागू होतात. ग्रहणाचा सूतक काळ 3 मार्चच्या पहाटे 6 वाजून 20 मिनिटांपासून सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत राहील.
advertisement
संतांचा आणि शास्त्राचा सल्ला
वृंदावनचे श्री प्रेमानंदजी महाराज आणि अनेक पंचांगकर्त्यांनुसार, ग्रहण काळ हा आनंदाचा किंवा रंगात न्हाऊन निघण्याचा काळ नसून तो ईश्वराच्या साधनेचा काळ आहे. ग्रहणाच्या सूतक काळात आनंदाचे उत्सव साजरे करणे किंवा रंगांशी खेळणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. प्रेमानंद महाराजांच्या मते, ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. रंगांच्या उत्सवात आपण बाहेर पडतो, एकमेकांना स्पर्श करतो आणि आरडाओरडा करतो. ग्रहण काळात आपली रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थिती संवेदनशील असते. अशा वेळी रंग खेळल्याने किंवा बाहेर पडल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी
असे मानले जाते की ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. अशा वेळी रंगांच्या धुंदीत घराबाहेर पडणे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक शांततेसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच, 3 मार्चचा दिवस शांत राहून नामस्मरणात घालवण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही कारणांमुळे 3 मार्च ऐवजी 4 मार्च 2026 हा दिवस रंग खेळण्यासाठी सर्वोत्तम आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
