TRENDING:

श्रीरामांच्या गाभाऱ्यातील अगरबत्तीसोबत लोकांनी काढले फोटो! वाचा, काय आहेत वैशिष्ट्य?

Last Updated:

श्रीरामांच्या गाभाऱ्यात लावली जाणारी ही विशेष अगरबत्ती खास औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ती जवळपास दीड महिने अविरत सुरू राहील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
ही अगरबत्ती तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला.
ही अगरबत्ती तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला.
advertisement

आग्रा : 22 जानेवारीला पार पडणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. या मंदिराच्या पायऱ्यांपासून खांबांपर्यंत सर्वत्र भारतीय संस्कृतीचं दर्शन होईल. कारण मंदिरात असणाऱ्या सर्व वस्तू भारताच्या कानाकोपऱ्यातील कुशल कारागिरांनी तयार केल्या आहेत. म्हणूनच हे मंदिर शिल्पकलेचं एक अद्वितीय उदाहरण असणार आहे. श्रीरामांच्या गाभाऱ्यात लावली जाणारी अगरबत्तीसुद्धा अतिशय खास असणार आहे.

advertisement

3610 किलो वजनी आणि 108 फूट लांबीची ही अगरबत्ती गुजरातहून ट्रकने अयोध्येत नेली जातेय. सोमवारी हा ट्रक उत्तर प्रदेशात दाखल झाला. तिथं अगरबत्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रामभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात अगरबत्तीचं स्वागत केलं. शिवाय या अगरबत्तीसह लोकांनी फोटोही काढले.

इथं मकर संक्रांतीला आई मुलाला देते तीळगूळ आणि घेते वचन; अत्यंत खास आहे परंपरा!

advertisement

गुजरातच्या बडोद्यात ही विशाल अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला. 3610 किलो वजन, 108 फूट लांबी आणि या अगरबत्तीची रुंदी जवळपास साडेतीन फूट इतकी आहे.

15 जानेवारीला संपतोय खरमास, मग सुरू होईल लग्नसराई! तुमचं ठरतंय कधी? 'हे' आहेत मुहूर्त

50 किलोमीटरपर्यंत पसरणार सुगंध

श्रीरामांच्या गाभाऱ्यात लावली जाणारी ही विशेष अगरबत्ती खास औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ती जवळपास दीड महिने अविरत सुरू राहील. तब्बल 50 किलोमीटर अंतरावर तिचा सुगंध पसरेल. गुजरातचे रहिवासी बिहाभरबाड यांनी ही अगरबत्ती तयार केली आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात भेट म्हणून देता यावी यासाठी ही अगरबत्ती तयार केल्याचं त्यांनी सांगितलं.

advertisement

अगरबत्तीत आहेत खास पदार्थ

ही अगरबत्ती तयार करण्यासाठी गायीचं शेण, देशी गायीच्या दूधापासून बनवलेलं तूप आणि धूप, इत्यादींसह अनेक औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/अध्यात्म/
श्रीरामांच्या गाभाऱ्यातील अगरबत्तीसोबत लोकांनी काढले फोटो! वाचा, काय आहेत वैशिष्ट्य?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल