गया : मानव आणि प्राणीप्रेमाची उदाहरणं आपण अनेक ऐकली असतील. प्राण्यांना संवेदना असतात, त्यांना आपल्या भावना कळतात, हे खरंच आहे. परंतु आपण कधी प्राण्यांच्या देवावरील श्रद्धेविषयी ऐकलंय का? याबाबत एक अत्यंत आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
आपण आतापर्यंत भाविकांना देवाची किंवा मंदिराची परिक्रमा करताना पाहिलं असेल. परंतु बिहारच्या गया जिल्ह्यात तर चक्क एक कुत्रा मंदिराची परिक्रमा करतोय. तब्बल महिन्याभरापासून भैरव मंदिरात हा कुत्रा देवाकडे साकडं घालतोय. त्याला पाहून सुरुवातीला लोकांना काही आश्चर्य वाटलं नाही. परंतु कुत्र्याला सतत मंदिराची परिक्रमा करताना पाहून लोकांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
advertisement
'या' मंदिरात भाविक जाळतात चक्क चांदीची अंगठी! अशा परंपरेमागे नेमकं कारण तरी काय?
मग लोकांनीही मानलं की हा कोणी साधासुधा प्राणी नाही, तर देवाचा भक्त आहे. तो थकल्यावर काहीवेळ थांबतो आणि जवळपास 10 मिनिटांनी पुन्हा परिक्रमा घालायला सुरुवात करतो. आता या कुत्र्याला पाहायला दूरदूरहून लोक याठिकाणी दाखल होतात. मंदिराचे पुजारी आकाश जयदेव गिरी सांगतात की, मागील महिन्याभरापासून हा कुत्रा याठिकाणी परिक्रमा घालतोय. महत्त्वाचं म्हणजे मंदिरात देवी मंगळागौरी भैरव बाबांसोबत विराजमान आहे आणि काळ्या श्वानाला भैरव बाबांचं वाहन मानलं जातं.
श्रीरामांच्या स्वागतासाठी नव्या नवरीसारखी सजणार अयोध्या! भाविकांना लुटू शकणार नाही कोणी
कुत्र्याची ही भक्ती पाहून आता हा चमत्कारच मानला जातोय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याठिकाणाहून आणखी एक चमत्कारिक घटना समोर आली होती. गया स्थानकाजवळ असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरातील दुर्गा देवीच्या डोळ्यांतून अश्रू आल्याचा दावा काही भाविकांनी केला होता. हा चमत्कार नेमका घडला कसा, याबाबत भाविकांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या चर्चांना उधाण आलं होतं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
