श्रीरामांच्या स्वागतासाठी नव्या नवरीसारखी सजणार अयोध्या! भाविकांना लुटू शकणार नाही कोणी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांना लखनऊ ते अयोध्यादरम्यानच्या प्रवासात प्रसन्न वाटावं यासाठी या मार्गावर अतिशय सुरेख अशी सजावट करण्यात येणार आहे.
अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी
लखनऊ : श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्या नगरीला अगदी नव्या नवरीसारखं सजवलं जातंय. 22 जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होतील. त्यांच्या सुरक्षिततेसाठी अयोध्या सज्ज आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सायंकाळी एक बैठक घेण्यात आली.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांना लखनऊ ते अयोध्यादरम्यानच्या प्रवासात प्रसन्न वाटावं यासाठी या मार्गावर अतिशय सुरेख अशी सजावट करण्यात येणार आहे. डॉ. रोशन जैकब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत लखनऊ ते अयोध्या मार्गावर कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, याबाबत चर्चा झाली.
advertisement
काय दिले आदेश?
अयोध्येला जाणाऱ्या सर्व मार्गांवर सोयी-सुविधांची चोख व्यवस्था आणि सुंदर अशी सजावट करावी. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. रस्त्यांवरील डागडुजीची सर्व कामं पूर्ण करून घ्यावीत, रस्त्यात ठिकठिकाणी लँडमार्क आणि डिव्हायडर असतील, याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
advertisement
रस्त्यांची होणार साफसफाई
रस्त्यांवरील सर्व लाईट्स व्यवस्थित सुरू आहेत ना, याची खात्री करून घ्यावी. लाईट्समध्ये बिघाड झाला असल्यास तो दुरुस्त करावा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शिवाय शहरातल्या सर्व लाईट्स सुरू असायला हव्या. कुठेही मातीचे ढिगारे, निरुपयोगी पोल असल्यास ते तात्काळ हटवावे, असंही सांगण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे श्रीरामांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक अयोध्येत दाखल होतील, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडून वाहतूकीचं अधिक भाडं घेतलं जात नाहीये ना, याबाबतही तपास करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
view commentsLocation :
Lucknow Cantonment,Lucknow,Uttar Pradesh
First Published :
January 05, 2024 8:48 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
श्रीरामांच्या स्वागतासाठी नव्या नवरीसारखी सजणार अयोध्या! भाविकांना लुटू शकणार नाही कोणी


