घरात पैसा टिकून राहण्यासाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती
आचार्य चाणक्य यांची नीती यश आणि अपयश यातील फरक अधोरेखित करते. चाणक्य नीतीच्या या भागात आज आपण अशाच एका विषयाची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने कोणत्या ठिकाणी क्षणभरही थांबू नये. चाणक्य नीतीचा हा श्लोक लक्षात ठेवा लोकयात्रा भयं लज्जा दाक्षिण्यं त्यागशीलता। पञ्च यत्र न विद्यन्ते न कुर्यात्तत्र संगतिम् ।। अर्थ- ज्या ठिकाणी उपजीविका उपलब्ध नाही. जिथे लोकांना भीती, लाज, औदार्य किंवा परोपकार नाही.
advertisement
अशा पाच ठिकाणी व्यक्तीने वास्तव्य करू नये. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जिथे उपजीविका नाही अशा ठिकाणी राहणे व्यर्थ आहे. कारण अशा ठिकाणी ना पैशाची देवाणघेवाण होते, ना मानवी प्रगतीचा मार्ग खुला होतो. यासोबतच त्यांनी सांगितले आहे की, जेथे राजा-प्रशासन किंवा धर्म-अधर्माचा भय-लज्जा नसते, तेथे क्रूरता आणि लोभ असतो.
इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचे चित्र का आहे?
अशा ठिकाणी राहणे हे माणसासाठी नरकासारखे आहे. शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, जिथे लोकांमध्ये औदार्य आणि दान करण्याची प्रवृत्ती नसते, तिथेही लक्ष्मी थांबत नाही किंवा आर्थिक किंवा भौतिक प्रगतीही होत नाही. सज्जन लोक क्षणभरही तिथे राहू शकत नाहीत, कारण अशा ठिकाणी हीन भावनेचा विस्तार होत असतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)