आमलकी एकादशी 2024 शुभ मुहूर्त -
फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी सुरू होते - 20 मार्च 2024 रोजी 12:21 AM
एकादशी तिथी समाप्त होईल - 21 मार्च 2024 रोजी 02:22 AM
आमलकी एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त 20 मार्च रोजी सकाळी 6.25 ते 9:27 पर्यंत आहे.
आमलकी एकादशीचे व्रत सोडणे -
advertisement
21 मार्च 2024 रोजी दुपारी 01:41 ते 04:07 पर्यंत उपवास सोडू शकता.
आमलकी एकादशीला शुभ योग -
हिंदू कॅलेंडरनुसार आमलकी एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवि योगासह अतिगंड आणि पुष्य नक्षत्र तयार होत आहे. रवि योग सकाळी 06.25 पासून सुरू होईल, जो रात्री 10.38 वाजता समाप्त होईल. यासोबतच सकाळपासून सायंकाळी 05.01 वाजेपर्यंत अतिगंड योग आहे. याशिवाय पुष्य नक्षत्र रात्री 10.38 पर्यंत आहे.
यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं मोठं संकट, आयुष्य होईल बेरंग, हा आहे तोडगा!
आमलकी एकादशीला आवळा वृक्षाची पूजा करावी -
आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षात भगवान विष्णूचा वास असतो, असे मानले जाते. आज आवळ्याच्या झाडाला फुलं, हार, अगरबत्ती आणि पाण्यासह दिवे लावून पूजा केल्यानं श्री हरी अत्यंत प्रसन्न होतो आणि सर्व प्रकारच्या दु:ख, वेदना आणि पापांपासून मुक्तता मिळते, असे मानले जाते.
आमलकी एकादशी 2024 पूजा पद्धत -
आवळा एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करत व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. पूजा सुरू करताना लाकडी पाठावर पिवळे कापड पसरून श्री हरी विष्णूचे चित्र स्थापित करा. यानंतर आचमन करून पिवळे चंदन, अक्षत, फुले, हार सोबत बेसनाचे लाडू, खीर इत्यादी अर्पण करून जल व तुपाचा नैवेद्य ठेवा, दिवा व उदबत्ती लावून एकादशी व्रत कथेसह विष्णु चालीसा व मंत्राने आरती करावी. शेवटी चुकीबद्दल माफी मागावी. त्यानंतर दिवसभर उपवास केल्यानंतर शुभ मुहूर्तावर उपवास सोडावा.
झोपाळ्याचं वास्तुशास्त्र! घरात झोपाळा या दिशेला असणं शुभ, झुलण्यापूर्वी पहा नियम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)