जालना शहरातील 25 सायकल प्रेमी 20 जून रोजी सकाळी सहा वाजता जालना शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. आमची ही तिसरी सायकलवारी आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि आपले शरीर तंदुरुस्त रहावे हा संदेश घेऊन आम्ही ही वारी घेऊन जात आहोत. राज्यभरातील तब्बल 5000 लोक पंढरपूर मध्ये एकत्र जमून सायकल रिंगण देखील करणार आहेत, असं सायकलिस्ट ग्रुप जालनाचे प्रशांत भाले यांनी सांगितलं.
advertisement
कशी असणार सायकल वारी?
जालना ते पंढरपूर हे अंतर 310 किमी आहे. तीन दिवसांची ही वारी असून दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला मुक्काम हा कुंथलगिरी येथे करण्यात येणार असून दुसरा मुक्काम थेट पंढरपुरात असणार आहे. जालना, वडीगोद्री, अंबड, बीड, कुंथलगिरी, बार्शी, येरमाळा, कुर्डूवाडी असा प्रवास असणार आहे. सगळ्यांनी सायकल चालवावी, सायकल चालवण्याचे शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी अनेक फायदे आहेत. यासाठी ही सायकलवारी असल्याचं सायकलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष भाले यांनी सांगितलं.