चिंचेची झाडे : वास्तु सल्लागार दिव्या छाब्रा यांच्या मते, 5 झाडे घरात ठेवू नयेत. कारण ती लोकांमध्ये रोग पसरवू शकतात, गोष्टी बिघडवू शकतात आणि घरात नकारात्मकता आणू शकतात. त्यांच्या मते, चिंचेची झाडे वाईट ऊर्जा आकर्षित करतात; त्यामुळे ती घराच्या आजूबाजूला किंवा घरात लावू नयेत. ती नकारात्मकता आकर्षित करू शकतात आणि मानसिक शांतीत व्यत्यय आणू शकतात.
advertisement
बोन्सायची झाडे : वास्तुशास्त्रानुसार, बोन्सायची झाडे अतिशय सुंदर असली तरी ती घरात ठेवण्यास मनाई आहे. ही झाडे घरात ठेवल्याने लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात समस्या येतात असे म्हटले जाते.
निवडुंगाचे झाड : दिव्या छाब्रा यांनी पुढे सांगितले की, निवडुंग (कॅक्टस) देखील घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. पानांवरील तीक्ष्ण काट्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते असे मानले जाते. हे रोप कुटुंबातील ताण आणि चिंता वाढवते. असेही मानले जाते की निवडुंग आणि इतर काटेरी झाडे घरात वाद आणि गोंधळ निर्माण करतात आणि रोमँटिक संबंधांना हानी पोहोचवतात. ती आर्थिक अडचणी निर्माण करण्यास सक्षम आहेत. हे रोप घराच्या दिवाणखान्यात, शयनकक्ष किंवा मुख्य प्रवेशद्वारावर ठेवू नये.
कापचाची झाडे : कापसाची झाडे सजावटीसाठी घरात ठेवली जातात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानले जात नाही. ती घरात ठेवणे म्हणजे घरात दुःख आणि दुर्भाग्य आणणे.
आयव्हीची रोप : लोक घराची शोभा वाढवण्यासाठी आयव्हीचे रोप (वेल) देखील आणतात. वास्तु तज्ज्ञानी सांगितले की, आयव्हीचे रोप विषारी मानले जाते. ते घरातील पाळीव प्राण्यांसाठी देखील चांगले नाही. आयव्हीमुळे त्वचेची जळजळ होते आणि जर ते चुकून खाल्ले तर ते खूप हानिकारक ठरू शकते.
हे ही वाचा : Astrology: जीव जडलेल्याचं यांना काहीही वाटत नाही! सहज ब्रेकअप करतात या राशींचे लोक
हे ही वाचा : मनासारखा जोडीदार हवाय? तर या मंदिराला अवश्य भेट द्या, करावी लागते अनोखी पूजा
