Astrology: जीव जडलेल्याचं यांना काहीही वाटत नाही! सहज ब्रेकअप करतात या राशींचे लोक

Last Updated:

Zodiac Signs And Breakups: आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना ब्रेकअप करताना फारसं काहीही वाटत नाही. जीव जडलेला असताना त्याच्यापासून दूर होणं यांना चांगलं जमतं. हे लोक समोरच्या कोणाच्याही भावनांकडे...

News18
News18
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचा उल्लेख आहे. कोणतीही व्यक्ती जन्माला येते तेव्हा ती या 12 राशींशी संबंधित असते. या 12 राशींचे स्वामी ग्रह वेग-वेगळे आहेत. त्यामुळेच विविध राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव वेगळे असतात. त्यांच्या आवडी-निवडी एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात.
आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना ब्रेकअप करताना फारसं काहीही वाटत नाही. जीव जडलेला असताना त्याच्यापासून दूर होणं यांना चांगलं जमतं. हे लोक समोरच्या कोणाच्याही भावनांकडे फारसे लक्ष देत नाहीत. स्वतःचा विचार येतो तेव्हा ते कोणाचेही मन तोडू शकतात.
मिथुन - मिथुन राशीचे लोक ब्रेकअप करण्यात तज्ञ मानले जातात. तसेच, हे लोक त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करतात, ज्यामुळे त्यांचे नाते जास्त काळ टिकत नाही. तर मिथुन राशीचे लोक व्यवसायिक असतात. शिवाय, हे लोक दूरदर्शी देखील असतात. हे लोक संशयास्पद स्वभावाचे असतात. या राशीचा स्वामी बुध आहे, जो त्यांना हे गुण प्रदान करतो.
advertisement
धनु - या राशीचे लोकही ब्रेकअप सहज करू शकतात. हे लोक भावनिक नसतात. तसेच, या लोकांचा मूड लवकर बदलतो, ज्यामुळे ते नात्यात जास्त काळ टिकू शकत नाहीत. हे लोक समोरच्या कोणाच्याही भावना पाहत नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी ते कोणाचेही मन मोडू शकतात. हे लोक त्यांच्या तत्वांवर ठाम असतात आणि त्यांच्या तत्वांशी तडजोड करत नाहीत. या राशीचे लोक थोडे अहंकारी देखील असतात. या राशीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे, जो त्यांना हे गुण देतो.
advertisement
वृश्चिक - हे लोक कोणाचेही मन अगदी सहजपणे मोडू शकतात. भावनिकता तशी फार नसते. या लोकांना खूप लवकर राग येतो. हे लोक कधीकधी त्यांच्या रागामुळे त्यांचे नाते खराब करतात. हे लोक धाडसी आणि निर्भय असतात. क्वचित हे लोक भावनिक असतात. तसेच, या लोकांना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. या राशीवर मंगळ ग्रहाचे अधिराज्य आहे, जो त्यांना हे गुण देतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: जीव जडलेल्याचं यांना काहीही वाटत नाही! सहज ब्रेकअप करतात या राशींचे लोक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement