TRENDING:

Ram Mandir - मातीच्या निर्जीव मूर्तीत प्राण कसे घालतात? कशी होते प्राणप्रतिष्ठा?

Last Updated:

प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा विधी झाला आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? प्राणप्रतिष्ठा का केली जाते? निर्जीव मातीच्या मूर्तीत प्राण कसे टाकले जातात? असे एक ना दोन कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
प्राणप्रतिष्ठा कशी होते?
प्राणप्रतिष्ठा कशी होते?
advertisement

प्राण या शब्दाचा अर्थ प्राणशक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. अशाप्रकारे प्राणप्रतिष्ठेचा शाब्दिक अर्थ प्राणशक्तीची स्थापना करणं असा होतो.  मत्स्य पुराण, वामन पुराण आणि नारद पुराणात प्राणप्रतिष्ठेचं महत्व सांगितलं आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, हा एक विधी आहे, ज्याद्वारे मंदिरात देव किंवा देवीच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. या संपूर्ण विधीदरम्यान प्रथमच वेद मंत्रांच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते.

advertisement

Ram Mandir Pran Pratishtha: अभिजीत मुहूर्तावरच प्राणप्रतिष्ठा! या मुहूर्तावर कराव्या अशा 10 गोष्टी

या विधीच्या आधी मूर्तीला सन्मानानं आणलं जातं. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहुण्यासारखे स्वागत केलं जातं. मग त्यावर सुवासिक वस्तूंचा लेप केला जातो, दुधानं अंघोळ घातली जाते, स्वच्छ केलं जातं आणि अभिषेक करण्यास योग्य बनविली जाते. त्यानंतरच्या प्रक्रियेत मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होते. या काळात मूर्तीचं तोंड पूर्वेकडे असतं. योग्य ठिकाणी स्थापित केल्यानंतर मंत्रोच्चार करून मूर्तीला अभिषेक केला जातो.

advertisement

पूजा केल्यानंतर सर्वप्रथम मूर्तीचे डोळे उघडतात, त्यानंतर डोळ्यात मध टाकला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेच्या मूर्तीची मंदिरात पूजा केली जाते.  अभिषेक झाल्यानंतर मूर्तीमध्ये एक दिव्य अनुभूती येते. शास्त्रानुसार मंत्रांच्या प्रभावाने मूर्तीच्या डोळ्यात ऊर्जा येते. त्यामुळे कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी, प्रतिबिंब म्हणजेच आरसा दृश्यमान केला जातो. डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे आरसा फुटतो.

advertisement

EXCLUSIVE : प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचं पहिलं दर्शन, PHOTOS

धर्मग्रंथानुसार, एकदा मूर्तीचा अभिषेक केला की तिच्या देखभालीची आवश्यकता नसते. ती कायम टिकते. मात्र त्याची उपासना सुरूच ठेवावी. असं मानलं जातं की प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवीच्या स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा केली नाही तर तिची शक्ती कमी होते.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir - मातीच्या निर्जीव मूर्तीत प्राण कसे घालतात? कशी होते प्राणप्रतिष्ठा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल