Ram Mandir Pran Pratishtha: अभिजीत मुहूर्तावरच प्राणप्रतिष्ठा! या मुहूर्तावर कराव्या अशा 10 गोष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Mandir Pran Pratishtha: ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजीत मुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने खरेदी किंवा कोणतेही शुभ कार्य केले तर त्याची सर्व कामे यशस्वी होतात.
नवी दिल्ली, 22 जानेवारी : अयोध्येतील राम मंदिरात आज रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या काळात अनेक शुभ योग तयार होत आहेत. रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगही तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजीत मुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने खरेदी किंवा कोणतेही शुभ कार्य केले तर त्याची सर्व कामे यशस्वी होतात. अभिजित मुहूर्त म्हणजे काय आणि आज कधी आहे? याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ.
आजचा अभिजीत मुहूर्त -
हिंदू कॅलेंडरनुसार, आज 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:11 ते 12:54 पर्यंत अभिजीत मुहूर्त तयार होईल.
अभिजीत मुहूर्तावर काय करावं-
1. सूर्याला जल अर्पण करा - अभिजीत मुहूर्तावर सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ आहे.
advertisement
2. भूमिपूजन करा - अभिजीत मुहूर्तावर भूमिपूजन केल्यानं जमीन समृद्ध होते.
3. कोणतंही नवीन काम सुरू करणं - यावेळी कोणतंही नवीन काम सुरू करणे शुभ असतं.
4. पैशांची गुंतवणूक - अभिजीत मुहूर्तावर पैसे गुंतवले तर फायदा होतो.
5. घरी पूजा करणे - अभिजीत मुहूर्तावर घरी पूजा करणे देखील शुभ मानले जाते.
advertisement
6. विवाह कार्य - या काळात विवाह किंवा विवाहाशी संबंधित कार्ये यशस्वी होतात.
7. मुंडन संस्कार - लहान मुलांच्या मुंडन संस्कारासाठी अभिजीत मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो.
8. गृहप्रवेश - अभिजीत मुहूर्तामध्ये केल्याने घरात शांती आणि सौहार्द राहते.
9. व्यवसाय सुरू करणे - यावेळी व्यवसाय सुरू केल्याने तुम्हाला नफा मिळू शकतो.
advertisement
10. धार्मिक विधी - अभिजीत मुहूर्तावर धार्मिक विधी करणे खूप फायदेशीर मानले जाते.
अभिजीत मुहूर्त म्हणजे काय?
धार्मिक मान्यतांनुसार, अभिजीत मुहूर्त हा दिवसातील सर्वोत्तम किंवा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार अभिजीत मुहूर्तामध्ये एखाद्या व्यक्तीने कोणतेही काम सुरू केले तर त्या कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 22, 2024 12:38 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir Pran Pratishtha: अभिजीत मुहूर्तावरच प्राणप्रतिष्ठा! या मुहूर्तावर कराव्या अशा 10 गोष्टी