Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! आज प्राण-प्रतिष्ठापनेचा दिवस! घरी अशी करा पूजा, मंत्र, आरती, शुभ योग

Last Updated:

Ramlala Puja Vidhi: आज दुपारी प्राणप्रतिष्ठा होणार असून सायंकाळी श्री राम ज्योती प्रज्वलित होणार आहे. या दिवशी विधीनुसार आपल्या घरी भगवान रामाची पूजा करून पुण्य लाभ मिळवू शकता.

News18
News18
नवी दिल्ली, 22 जानेवारी : अयोध्येतील राम मंदिरात आज सोमवार 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर प्रभू रामललाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना होणार आहे. आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी प्राणप्रतिष्ठा होणार असून सायंकाळी श्री राम ज्योती प्रज्वलित होणार आहे. या दिवशी विधीनुसार आपल्या घरी भगवान रामाची पूजा करून पुण्य लाभ मिळवू शकता. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया, आज रामललाच्या प्राण-प्रतिष्ठापनेदिनी आपण आपल्या घरी भगवान रामाची पूजा कशी करावी. प्रभू रामाची उपासना पद्धत, मुहूर्त, मंत्र, आरती, नैवेद्य इत्यादींबद्दल जाणून घेऊया.
रामललाची पूजा कधी करावी?
आज सकाळपासून ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्र तयार झाले असून सकाळी 7:15 पासून सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार झाला आहे. या वेळेपासून तुम्ही रामललाची पूजा करू शकता. दुपारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पाहून पुण्य कमवावे.
प्रभू रामाची पूजा करण्याची पद्धत -
सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर रामललाची मूर्ती किंवा चित्र लाकडी चौरंग किंवा पाटावर स्थापित करा. त्यानंतर पंचामृताने मूर्तीला स्नान करावे. त्यानंतर प्रभू रामाला पाण्याने अभिषेक करा. त्यांना कपडे घाला. चंदनाने टिळा लावावा. त्यांना फुले आणि हारांनी सजवा.
advertisement
यानंतर रामललाला अक्षत, फुले, फळे, धूप, दिवा, नैवेद्य, तुळशीची पाने, सुगंधी इत्यादी अर्पण करा. तुम्ही त्यांना सुवासिक लाल, पिवळी, पांढरी फुले अर्पण करू शकता. तुम्ही रामलालला रसगुल्ला, लाडू, हलवा, इमरती, खीर इत्यादी मिठाई अर्पण करू शकता. आपण घरी तयार केलेले अन्न देखील देऊ शकता.
पूजा करताना राम नामाचा जप करावा. श्री राम चालिसा पठण करा. तुम्ही एकश्लोकी रामायण देखील वाचू शकता. त्यानंतर तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा कापूर लावून रामाची आरती करावी. घरात दिवे लावावे.
advertisement
आजचा शुभ काळ -
शुभ वेळ: दुपारी 12:11 ते दुपारी 12:54 पर्यंत
आजचा शुभ योग -
सर्वार्थ सिद्धी योग: सकाळी 07:14 ते 04:58
अमृत सिद्धी योग: सकाळी 07:14 ते 04:58
रवि योग: सकाळी 04:58 ते 07:13
ब्रह्मयोग: सकाळी 08:47 पर्यंत
इंद्र योग: सकाळी 08:47 ते रात्री
advertisement
भगवान राम पूजा मंत्र -
1. ऊं रामचंद्राय नमः
2. रां रामाय नमः
3. ऊं नमो भगवते रामचंद्राय
एकश्लोकी रामायण -
आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम्।
बालीनिग्रहणं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं
पश्चाद्रावणकुंभर्णहननमेतद्धि रामायणम्।।
प्रभु रामाची आरती -
श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्।
advertisement
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।
भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्।
रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नन्दनम्।।
आर्थिक तंगी दूर करेंगे फिटकरी के 5 चमत्कारी उपाय
आर्थिक तंगी दूर करेंगे फिटकरी के 5 चमत्कारी उपायआगे देखें...
advertisement
सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदारू अंग विभूषणं।
आजानु भुज शर चाप धर संग्राम जित खर-धूषणं।।
इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम्।
मम ह्रदय कुंज निवास कुरु कामादी खल दल गंजनम्।।
मनु जाहिं राचेऊ मिलिहि सो बरु सहज सुंदर सावरों।
करुना निधान सुजान सिलू सनेहू जानत रावरो।।
एही भांती गौरी असीस सुनी सिय सहित हिय हरषी अली।
advertisement
तुलसी भवानी पूजि पूनी पूनी मुदित मन मंदिर चली।।
दोहा- जानि गौरी अनुकूल सिय हिय हरषु न जाइ कहि।
मंजुल मंगल मूल वाम अंग फरकन लगे।।
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! आज प्राण-प्रतिष्ठापनेचा दिवस! घरी अशी करा पूजा, मंत्र, आरती, शुभ योग
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement