Ram Mandir: मर्यादा पुरुषोत्तम! प्रभु श्रीरामाच्या जीवनातील हे 7 गुण आचरणात आणावे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Mandir: 14 वर्षे वनवास भोगूनही श्रीरामाने मर्यादा, दया, सत्य, करुणा आणि धर्म यासारख्या गोष्टींचे आचरण सोडले नाही. त्यामुळे त्यांना सर्वश्रेष्ठ राजा म्हटले गेले.
मुंबई, 22 जानेवारी : कर्म चांगले असणाऱ्याला जगात वेगळी ओळख मिळते. व्यक्तीचे चांगले कर्म आणि चांगले आचरण हेच त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. पुरुषत्वाचे प्रतिक आणि सनातन धर्माचे उपासक प्रभू राम यांच्या चारित्र्यामध्ये अनेक गुण आहेत, ज्याचे आचरण करून आपण आपले जीवन यशस्वी करू शकतो. 14 वर्षे वनवास भोगूनही श्रीरामाने मर्यादा, दया, सत्य, करुणा आणि धर्म यासारख्या गोष्टींचे आचरण सोडले नाही. त्यामुळे त्यांना सर्वश्रेष्ठ राजा म्हटले गेले. आपणही आपल्या आयुष्यात भगवान श्रीरामाच्या चारित्र्याचे 7 गुण अंगीकारू शकतो. याबाबत ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
जीवनात आत्मसात करावे असे प्रभू रामाचे 7 गुण -
1.धैर्यवान श्रीराम
प्रभू रामाच्या सात गुणांपैकी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे धैर्यवान किंवा सहनशील. पटकन काहीही साध्य करण्याची अभिलाषा प्रत्येक वेळी काम बिघडू शकते. तुमच्याकडे धैर्य आणि सहनशीलता असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता.
2. दयाळूपणा
प्रभु रामाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या मनात मानव आणि प्राण्यांबद्दल दयेची भावना असली पाहिजे. ही गुणवत्ता व्यक्तीची प्रतिमा सुधारते.
advertisement
3. नेतृत्व क्षमता
प्रभु श्रीराम राजा आणि कुशल व्यवस्थापक असूनही सर्वांना बरोबर घेऊन गेले. त्यांच्या या गुणामुळे समुद्रात दगडांनी पूल बांधणे शक्य झाले.
4. आदर्श बंधू
भाऊ-बहिण, नात्यात वाद होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. भांडणानंतरही भावा-बहिणींमध्ये परस्पर प्रेम असावं, हा गुण प्रभू रामाकडून शिकायला हवा. आपल्या भावांप्रती त्याचे समर्पण आणि त्याग त्याला एक आदर्श भाऊ बनवतो.
advertisement
5. मित्रता
प्रभु रामातील मैत्रीचा गुण प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे. प्रभू रामानं मैत्रीचं नातं मनापासून जपलं होतं. केवट, सुग्रीव, निषादराज आणि विभीषण हे त्यांचे परममित्र होते. मैत्री टिकवण्यासाठी प्रभू रामाने स्वतः अनेक संकटांचा सामना केला.
6. दृढ़प्रतिज्ञ (दृढनिश्चियी)
advertisement
प्रत्येकानं आपल्या जीवनात प्रभू रामाचे निश्चित गुण अंगीकारले पाहिजेत. व्यक्तीमध्ये दृढनिश्चियता असते ती व्यक्ती आयुष्यात नेहमीच यश मिळवते.
7. सद्गुणी
प्रत्येक व्यक्तीने प्रभू रामासारखे सदाचारी असले पाहिजे. त्यांच्या चांगल्या आचरणामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. तुमची चांगली वागणूक आणि आचरण तुम्हाला यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 22, 2024 12:12 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir: मर्यादा पुरुषोत्तम! प्रभु श्रीरामाच्या जीवनातील हे 7 गुण आचरणात आणावे