मुंबई: राम जन्मभूमी अयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. गावोगावी साजरा होणारा हा सोहळा म्हणजे दिवाळीपेक्षा कमी नाही. देशातील प्रत्येक कोपरा, गल्ली, घर हे राममय झालं आहे. विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या सोहळ्याच्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मालाडमधील औरीस सिरोनेटी या सोसायटीतील प्रवेशद्वारासमोर राम मंदिरासारखी हुबेहूब प्रतिकृती सादर करण्यात आली आहे.
advertisement
प्रवेशद्वारावरच राम मंदिराची प्रतिकृती
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा उत्साह संपूर्ण देशभर आहे. त्यामुळेच मालाडमधील औरीस सिरोनेटी इमारतीतील रहिवाशांनी एकत्र येत खास देखावा तयार केला आहे. अयोध्येतील राम मंदिरासारखेच हुबेहुब मंदिर याठिकाणी साकारले आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील हा भव्य देखावा मनात भरणारा आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही हा देखावा पाहायला आवर्जून येत आहेत.
नवं लग्न झालं अन् धरला अयोध्येचा रस्ता, कारसेवक जोडप्याने सांगितला 'तो' अनुभव, Video
दरम्यान, सगळेच प्रभू रामचंद्रांच्या नामघोषात दंग असलेले पाहायला मिळतायंत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देशात सध्या राममय वातावरण झाले आहे आणि फक्त देशातच नाही तर, परदेशात, सर्वत्र रामभक्तांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना नक्कीच सर्वांच्या जवळची आणि कायम लक्षात राहणारी असेल हे नक्की.