करौली : असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. परंतु अनेकदा आपल्या कुंडलीतील दोषांमुळे आपलं लग्न जुळण्यात किंवा मनासारखा जोडीदार मिळण्यात अडचणी येतात. मात्र कुंडलीत जसे दोष निर्माण होतात, तसेच ज्योतिषशास्रात त्यांवर उपायही असतात. आपणही आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहत असाल, तर ही माहिती तुमच्याचसाठी.
हिंदू धर्मात गरजू व्यक्तीला दान करणं शुभ मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या दानाला तर अनन्यसाधारण महत्त्व असतं. आता येत्या 15 तारखेला संक्रांत साजरी होईल. त्यामुळे या दिवशी न विसरता एखाद्या गरजवंताला मदत करा. विशेष म्हणजे यंदाची मकर संक्रांत चार राशींच्या व्यक्तींसाठी प्रचंड सुख घेऊन येणार आहे. या राशी आहेत सिंह, धनू, मिथुन आणि मेष. यामध्ये तुमची कोणती रास असेल तर एकाच उपायाने तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल.
advertisement
Makar Sankranti 2024 : लग्न झाल्यानंतर महिला पहिली मकर संक्रांत सासरी का साजरी करत नाहीत? पाहा Video
तुमची रास सिंह, धनू, मिथुन किंवा मेष असेल आणि तुम्हाला लग्न करायचं असेल, तर आवर्जून मंदिरात जा आणि तिथं आठ वांगी किंवा आठ बदामांचं दान करा. हे दान आपल्याला संक्रांतीच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 13 जानेवारीला करायचं आहे. हे काम फार सोपं वाटत असलं, तरी तेच तुमचं आयुष्य बदलेल हे नक्की. तुमच्या आयुष्यात लवकरच उत्तम जोडीदाराचं आगमन होईल. विशेषतः तरुणांना अप्सरेसारखी सुंदर बायको मिळेल.
अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखायची? तुमची फसवणूक तर होत नाहीये ना...
राजस्थानच्या करौली भागातील ज्योतिषी गिर्राज प्रसाद सोनी यांनी सांगितलं की, तुम्ही आठ वांगी आणि आठ बदामांचं दान केल्यास उत्तम. परंतु ते शक्य नसेल तर आपण मंदिरात एका रुपयाची आठ नाणीदेखील दान करू शकता. अगदी न चूकता हे काम करायला हवं. शिवाय याचं फळ मिळणार हे निश्चित, असं ज्योतिषी म्हणाले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g