वास्तुशास्त्राव्यतिरिक्त, चीनी फेंगशुईमध्ये, कासवाला संपत्ती आकर्षित करण्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांनी कासवाकृती अंगठीबाबत काही नियम सांगितले आहेत.
कासवाकृती अंगठी घालण्याचे फायदे - वास्तुशास्त्रानुसार जो व्यक्ती अशी अंगठी धारण करतो, त्याला जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा आणि संपत्ती प्राप्त होते. याशिवाय आर्थिक चणचण दूर होते. धार्मिक मान्यतेनुसार, कासव हा भगवान विष्णूचा कच्छप अवतार मानला जातो. हा अवतार भगवान विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी घेतला होता. ही अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
advertisement
ज्योतिष शास्त्रानुसार मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी परिधान करू नये. असे केल्याने ग्रह दोषांमुळे मोठे नुकसान होऊ शकते.
आनंदी-आनंद गडे! चारी बाजूंन येणार नुसता पैसा; पूर्ण आठवडा या राशींसाठी भाग्याचा
कासवाकृती अंगठी खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. खरेदी केल्यानंतर घरात माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ती काही वेळ ठेवा. त्यानंतर ती दूध-पाण्याच्या मिश्रणात धुवावी किंवा गंगाजलानं धुऊन पवित्र करावी. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि नंतर उदबत्ती दाखवून हातात धारण करा.
शुक्रवारी ही अंगठी घालणे शुभ असते. ती परिधान करताना, लक्षात ठेवा की, कासवाचा चेहरा आपल्या दिशेला असावा. त्यामुळे पैसा आपल्याकडे आकर्षित होतो. कासवाचा चेहरा बाहेरच्या बाजूला असेल तर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. ही अंगठी नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनीमध्ये घालावी.
अंगठी कोणत्या धातूची - चांदीच्या धातूमध्ये कासवाची अंगठी घालणे नेहमीच शुभ असते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मनावर होतो. एकदा अंगठी घातली की ती पुन्हा पुन्हा काढू घालू नये. त्यामुळे त्याची दिशा बदलते आणि पैशाच्या येण्यामध्ये अडचण येते.
हेकेखोर की मनमिळावू? जन्मतारीख सांगेल कसा आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
