TRENDING:

लिंबू मिरची फ्रिजमध्ये एकत्र ठेवता? मग तुम्ही मोठी चुक करताय; देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

Last Updated:

तुम्हाला माहीत आहे का? ही एक छोटीशी सवय तुमच्या घरात कटकटी आणि अशांतीचं कारण ठरू शकते. प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी नुकत्याच एका प्रवचनात याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या घराचा किचन हा केवळ जेवण बनवण्याची जागा नसून, तो सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू मानला जातो. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूची मांडणी कशी असावी, यावर घरातील सुख-शांती अवलंबून असते असं शास्त्रात सांगितलं जातं. आजच्या आधुनिक काळात आपल्या सर्वांच्याच घरी फ्रिज (Refrigerator) आहे. आपण बाजारहाट करून आलो की सर्व भाज्या एकाच वेळी फ्रिजमध्ये भरून ठेवतो. अनेकदा मिरचीच्याच डब्यात किंवा टोपलीत आपण लिंबूही ठेवतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण तुम्हाला माहीत आहे का? ही एक छोटीशी सवय तुमच्या घरात कटकटी आणि अशांतीचं कारण ठरू शकते. प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी नुकत्याच एका प्रवचनात याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. लिंबू आणि मिरची एकत्र का ठेवू नयेत? यामागे नेमकी काय श्रद्धा आणि तर्क आहे? जाणून घेऊया.

लिंबू-मिरची एकत्र ठेवल्याने 'क्लेश' वाढतात?

advertisement

देवकीनंदन ठाकूर यांच्या मते, लिंबू आणि मिरची या दोन्ही वस्तूंची प्रकृती अत्यंत 'तीव्र' असते. धार्मिक आणि पारंपारिक मान्यतेनुसार या दोन्ही गोष्टींचा संबंध ऊर्जेशी जोडला जातो. मिरची खाल्ल्यावर लगेच तिखटपणा जाणवतो, तर लिंबू प्यायल्यावर त्याचा आंबटपणा जिभेला झणझणून सोडतो.

जेव्हा आपण या दोन तीव्र प्रकृतीच्या गोष्टी एकाच डब्यात किंवा फ्रिजमध्ये एकाच जागेवर ठेवतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा घरातील वातावरणावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. यामुळे घरात विनाकारण वादविवाद, तणाव आणि क्लेश निर्माण होण्याची शक्यता असते, असं त्यांनी सांगितलं.

advertisement

आधुनिक जीवनशैली आणि जुन्या परंपरा

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सोयीला महत्त्व देतो, पण परंपरेला विसरत चाललो आहोत. देवकीनंदन ठाकूर यांनी फ्रिजच्या अतिवापराबाबतही भाष्य केलं आहे.

लिंबू आणि मिरची वेगळी ठेवण्याचा सल्ला हा केवळ एक नियम नसून, तो जीवनात शिस्त आणि संतुलन राखण्याचा एक संदेश आहे, असंही ते म्हणाले.

advertisement

View this post on Instagram

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अंधांना समजतील अडथळे, विद्यार्थ्यांने बनवली स्मार्ट स्टिक अन् खास गॉगल
सर्व पहा

A post shared by

मराठी बातम्या/अध्यात्म/
लिंबू मिरची फ्रिजमध्ये एकत्र ठेवता? मग तुम्ही मोठी चुक करताय; देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल