शनि जयंतीला 'या' चुका करू नका
तामसी भोजन टाळा : या दिवशी मांस, मद्य किंवा कोणत्याही प्रकारचे तामसी भोजन करणे अशुभ मानले जाते. शनि जयंतीच्या दिवशी फक्त सात्विक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करा.
घाण तेल दान करू नका : तेलाचं दान करणं शुभ मानलं जातं, पण घाण किंवा जुनं तेल दान करणं वर्जित आहे. शनिदेवासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शुद्ध मनाने आणि हेतूने तेलाचं दान करा.
advertisement
अन्याय किंवा अपमान करू नका : गरीब, गरजू किंवा प्राणी-पक्ष्यांशी कठोर वर्तन केल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात. या दिवशी शक्य तेवढी सेवा करा, इतरांना मदत करा आणि प्रत्येकाशी आदराने वागा.
शनिदेवाला प्रसन्न कसं कराल?
- पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
- शनिदेवाच्या मूर्तीसमोर काळे उडीद, काळे तीळ, मोहरीचं तेल, काळे कपडे किंवा काळी छत्री दान करा.
- या गोष्टी लक्षात ठेवून शनि जयंतीला पूजा केल्यास शनिदेव नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला न्यायाचा आशीर्वाद मिळेल.
हे ही वाचा : गुरूंशिवाय यशस्वी होता येतं का? प्रेमानंद महाराजांनी सांगितले गुरु-शिष्य नात्यातील रहस्य!
हे ही वाचा : Chanakya Niti : मानवी जीवनात 'हे' आहे महापाप, जिथे देवही करत नाही माफ!