22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामललाच्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातून हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी होतील आणि करोडो लोक आपापल्या घरी दिवे लावून उत्सव साजरा करतील. या काळात देशातील विविध राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय राजस्थान, गुजरात आणि उत्तराखंड सरकारने 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
advertisement
धनहानीचं संकट ओढावतं! घरातील या गोष्टींना कधीही पायांनी स्पर्श करू नये
या दिवसानिमित्त अनेक राज्यांच्या सरकारने ड्राय डे जाहीर केला आहे. म्हणजेच 22 जानेवारी रोजी या राज्यांमध्ये ना वाईन खरेदी करता येणार आहे ना दारू विकली जाणार आहे. या राज्यांमध्ये सर्व देशी दारू, विदेशी दारूची किरकोळ दुकाने, हॉटेल, बार क्लब आदी बंद राहणार आहेत.
ज्या राज्यांमध्ये ड्राय डे राहणार आहे, त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा आणि आसामचा समावेश आहे. या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात ड्राय डे असेल अशी अधिकृत घोषणा केली आहे.
Ram Mandir: रामलल्लाची मूर्ती घडवण्यासाठी काळा पाषाण वापरण्याचं कारण काय?
रामललाच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी, लोक आपापल्या घरांमध्ये आणि जवळच्या मंदिरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा करू शकतात आणि रामाचे भजन गाऊन प्रतिकात्म अयोध्येच्या कार्यक्रमात मनापासून सहभागी होऊ शकतात.