TRENDING:

Masik Shivratri 2024: सिद्धी योगात मासिक शिवरात्री! शिवपूजा मुहूर्त, सुखी जीवनासाठी बेलपत्राचे उपाय

Last Updated:

Masik Shivratri 2024: काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया की मासिक शिवरात्रीला सिद्धी योग कधीपासून आहे? मासिक शिवरात्री पूजेचा मुहूर्त? मासिक शिवरात्रीला बेलपत्राचे कोणते उपाय करावेत, याविषयी जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 03 फेब्रुवारी : पौष महिन्यातील मासिक शिवरात्री गुरुवार, 08 फेब्रुवारी रोजी आहे. त्या दिवशी सिद्धी योग तयार होत आहे. याशिवाय गुरुवारचे व्रत असल्यानं त्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाईल. त्या दिवशी, मासिक शिवरात्री आणि गुरुवार व्रताच्या पुण्यपूर्ण प्रभावाने तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद मिळू शकतात. ही फेब्रुवारीची मासिक शिवरात्री आहे. शिवरात्रीला आपण सुखी जीवनासाठी बेलपत्राचा उपाय करू शकता. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया की मासिक शिवरात्रीला सिद्धी योग कधीपासून आहे? मासिक शिवरात्री पूजेचा मुहूर्त? मासिक शिवरात्रीला बेलपत्राचे कोणते उपाय करावेत, याविषयी जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

मासिक शिवरात्री 2024 मुहूर्त -

दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:17 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:02 पर्यंत आहे. निशिता पूजा मुहूर्त मासिक शिवरात्रीच्या पूजेसाठी वैध आहे.

मासिक शिवरात्रीचे व्रत पाळणारे सूर्योदयापासून भगवान शंकराची उपासना करू शकतात. तथापि, ज्यांना निशिता मुहूर्तावर मासिक शिवरात्रीची पूजा करायची आहे, ते रात्री 12:09 ते 01:01 या वेळेत पूजा करू शकतात.

advertisement

मासिक शिवरात्री 2024 सिद्धी योगात -

मासिक शिवरात्रीच्या दिवशी सिद्धी योग तयार होतो. सिद्धी योग सूर्योदयापासून रात्री 11:10 पर्यंत आहे. सिद्धी योगाचा स्वामी गणेश आहे. या योगात तुम्ही जे काही काम कराल ते यशस्वी ठरेल. सिद्धी योगात शिवरात्रीची मासिक पूजा केल्यावर जी काही इच्छा असेल ती महादेवाच्या कृपेनं पूर्ण होईल.

advertisement

फेब्रुवारीमध्ये 4 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन! या 6 राशींचे भाग्य उजळणार

बेलपत्रासाठी उपाय -

1. मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपाय: मासिक शिवरात्रीच्या दिवशी 11 बेलाच्या पानांवर चंदनाने जय श्री राम किंवा ओम नमः शिवाय लिहावे. त्यानंतर पूजेच्या वेळी एक एक करून भगवान शिवाला अर्पण करा. त्या वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. शिवाच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

advertisement

2. धनप्राप्तीचा उपाय: मासिक शिवरात्रीला शिवपूजेच्या वेळी भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करा. पूजा संपल्यानंतर ती बेलपत्राची पाने तिजोरीत ठेवावीत. असे मानले जाते की, महादेवाच्या कृपेनं व्यक्तीचे धन आणि संपत्ती वाढते.

प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Masik Shivratri 2024: सिद्धी योगात मासिक शिवरात्री! शिवपूजा मुहूर्त, सुखी जीवनासाठी बेलपत्राचे उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल