TRENDING:

घरात पैसा टिकून राहण्यासाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती

Last Updated:

चला जाणून घेऊया चाणक्य नीती पैशांबद्दल काय सांगते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 16 सप्टेंबर: आचार्य चाणक्य हे त्यांचे राजनैतिक कौशल्य, बुद्धिमत्ता तसेच अद्वितीय प्रतिभेने समृद्ध होते. त्यांनी सांगितलेली नीती ज्याला चाणक्य नीती म्हणतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळातही समर्पक आहेत आणि बर्‍याच अंशी अचूक असल्याचे सिद्ध होते. जर तुम्ही नीतीचे पालन केले तर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहील. चला जाणून घेऊया चाणक्य नीती पैशांबद्दल काय सांगते.
News18
News18
advertisement

रत्नशास्त्रानुसार लोकप्रियतेत वाढ करते हे रत्न, प्रत्येक पावलावर मिळते यश

कष्टाने कमवा पैसे चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने संपत्ती जमा करतो त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. कष्टकरी लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. यासोबतच अन्नाचा आदर करणे आवश्यक आहे, असे मानले जाते. कष्टाने अन्न आणि पैसा मिळत असेल तर वरदान मिळते आणि अशा लोकांवर लक्ष्मीजी प्रसन्न होतात. घरात ठेवा शांततेचे वातावरण घरात लक्ष्मीचा वास असावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते.

advertisement

पशुपक्षी स्वप्नात दिसण्याचे विशेष संकेत, आयुष्यात होणाऱ्या गूढ बदलांविषयी

ज्या घरात शांतता आणि स्वच्छतेचे वातावरण असते त्याच घरात धनाची देवी लक्ष्मी वास करते. दुसरीकडे, ज्या घरात संघर्ष असतो त्या घरात लक्ष्मीजी कधीच वास करत नाहीत. स्त्रियांचा नेहमी करा आदर ज्या घरात लक्ष्मी वास करत नाही त्या घरात स्त्रियांचा आदर होत नाही. प्रेम आणि त्यागाने एकमेकांचा आदर करणारे पती-पत्नी जिथे राहतात, लक्ष्मी स्वतः तिथे येते. दुसरीकडे, जिथे सतत वाद आणि विवाद विकोपाला जातात अशा घरांपासून लक्ष्मी नेहमी दूर राहते.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
घरात पैसा टिकून राहण्यासाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल