पशुपक्षी स्वप्नात दिसण्याचे विशेष संकेत, आयुष्यात होणाऱ्या गूढ बदलांविषयी
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात वानर दिसण्याचा शुभ आणि अशुभ अर्थ
मुंबई, 4 सप्टेंबर: स्वप्नशास्त्रालाही बहुतांश भाविक मानतात. झोपेनंतर प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे एखाद-दुसरे स्वप्न पाहतो. अनेकांना त्यांची स्वप्ने आठवतात, तर अनेकांना जाग येताच ही स्वप्ने विस्मृतीत जातात. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा स्वतःचा अर्थ असतो, ज्याला वेळीच ओळखून माणूस प्रत्येक समस्येपूर्वी स्वतःला वाचवू शकतो. अशा पशू-पक्ष्यांबद्दल बोलायचे तर त्यांना पाहण्याचा अर्थ वेगळाच असतो. तसेच एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वानर दिसले तर त्याचाही शुभ किंवा अशुभ अर्थ होतो.
लग्न जुळवताना अष्ट कुट मिलन महत्त्वाचे, जाणून घ्या किती गुण जुळणे महत्त्वाचे?
जाणून घ्या, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात वानर दिसण्याचा शुभ आणि अशुभ अर्थ. हसणारे वानर दिसले तर जर एखाद्याला स्वप्नात वानर हसताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की चांगला काळ सुरू होणार आहे. अशा स्थितीत आर्थिक लाभासोबतच समाजात व्यक्तीचा सन्मान वाढतो. कळपातील वानर दिसणे स्वप्नशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वानरांचा कळप दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला लवकरच आर्थिक लाभ होईल. यासोबतच कुटुंबात सुख-शांती नांदते राहील.
advertisement
वानरांचे भांडण जर तुम्हाला स्वप्न पडले की वानरे आपसात भांडत आहेत, तर याचा अर्थ असा आहे की काही कारणास्तव कुटुंबात तेढ होऊ शकते. वानर अन्न चोरताना दिसणे स्वप्नात वानर अन्न चोरताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला लवकरच धनप्राप्ती होणार आहे. वानर पोहताना पाहणे जर स्वप्नात वानर पोहताना दिसले, तर याचा अर्थ लवकरच तुमची अनेक समस्यांपासून सुटका होणार आहे. वानराने चावा घेणे जर तुम्हाला स्वप्न पडले की वानराने तुम्हाला चावा घेतला आहे, तर समजून घ्या की भविष्यात काही गंभीर दुखापत होणार आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2023 2:01 PM IST