TRENDING:

अनेक दशकांनी आला अनोखा योग, आयुष्यात येईल सुख-समृद्धी, नाशिकच्या महंतांनी काय सांगितलं?

Last Updated:

guru pushya yoga - या काळात जर तुम्ही काही कामे केली तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते. तुमच्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते, अशी माहिती नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री यांनी दिली. त्यामुळे ही कामे नेमकी कोणती आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
advertisement

नाशिक - गुरू पुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की, गुरु पुष्य योग तयार होतो. यंदा हा योग दिवाळीच्या अगोदर तयार झाला असून 24 ऑक्टोबरला योग्य अनेक वर्षांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा गुरू पुष्य योग जुळून आला आहे. या काळात जर तुम्ही काही कामे केली तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते. तुमच्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते, अशी माहिती नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री यांनी दिली. त्यामुळे ही कामे नेमकी कोणती आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. कालाष्टमीच्या दिवशी हा शुभ योग तयार होणे अत्यंत लाभदायक मानला जात आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख-समृद्धीही निर्माण होते.

advertisement

अनेक दशकांनंतर दिवाळी आणि गुरुपुष्पामृत मुहूर्त एकाच महिन्यात आल्याने हा दिवस अतिशय शक्तीशाली असणार असल्याची माहिती नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकल18 सोबत बोलताना दिली.

एसआयपी की आरडी, कोणती गुंतवणूक फायद्याची?, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

यंदा गुरुपुष्य योग हा सकाळी 06.:38 वाजून ते दुसऱ्यादिवशी 06: 30 मिनिटांपर्यंत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते. तसेच आपण या दिवशी औषधी वनस्पतींना प्रार्थना करून घरात आले तर आपले जीवन हे आरोग्यमय होते, असेही ते म्हणाले. तसेच यंदाच्या गुरू पुष्य योगात काय करावे, याची माहितीही अनिकेत शास्त्री यांनी दिली.

advertisement

गुरु पुष्य योगात काय करावे -

  • गुरु पुष्य योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करावे. त्यानंतर देवघरात ठेवावे.
  • गुरु पुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्याप्रकारे गुंतवणूक करु शकता.
  • याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करु शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करु शकतो.
  • advertisement

  • तुमचा व्यवसाय असेल तर त्यासंबंधीत कामे यादिवशी करता येतील. जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता.
  • पैशांशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरू पुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. तसेच लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे, असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते.
  • गुरू पुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करुन पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सूचना - ही माहिती ज्योतिष/महंतांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही. 

मराठी बातम्या/अध्यात्म/
अनेक दशकांनी आला अनोखा योग, आयुष्यात येईल सुख-समृद्धी, नाशिकच्या महंतांनी काय सांगितलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल