एसआयपी की आरडी, कोणती गुंतवणूक फायद्याची?, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
investment tips - योग्य ठिकाणी गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, याचबाबत जाणून घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले, जाणून घेऊयात.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम जमवायची असेल तर तुम्हाला बचत करावी लागेल. दर महिन्याला थोडी थोडी बचत करुन तुम्ही ती कुठेतरी गुंतवू शकता. आज गुंतवणुकीसाठी लोकांसमोर पुष्कळ पर्याय आहेत. पण अनेकांना गुंतवणूक कोठे करावी हे माहित नसते. काही लोक एफडी, आरडीमध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. अनेक गुंतवणूकदारांना एफडीमध्ये गुंतवणूक करावी की एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी, असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. गुंतवणुकीसाठी तुम्ही अगदी 1500-1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता. त्यापैकी आरडी ही बँक किंवा पोस्टात सुरू करू शकता.
advertisement
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला डिमॅट अकाऊंट उघडावे लागते. आरडी आणि एसआयपीमध्ये फायदे आणि तोटे या दोघांची माहिती असणे आवश्यक आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, याचबाबत जाणून घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
आरडी म्हणजे काय?, आरडीमध्येच बंद केली तर काय होतं?
तुम्ही बँकेत आरडी सुरू केल्यानंतर एका ठराविक काळासाठी निर्धारित केली जाते. प्रत्येक बँकेत वर्षानुसार आरडीचे व्याजदर वेगवेगळे असतात. तसेच पोस्टातही आरडी सुरू केली जाते. पोस्टात जर आरडी सुरू करायची असेल तर ती किमान 5 वर्षासाठी करावी लागते. आरडीचा फायदा असा आहे की तुम्हाला त्यात हमी परतावा मिळतो. हा एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय असल्याने बरेच लोक याची निवड करतात.
advertisement
बहुतेक लोक आरडीद्वारे जमा केलेले पैसे पुन्हा एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पण तुम्ही आरडीमध्येच बंद केली तर दंड सोसावा लागतो आणि आरडीवर कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील घेऊ शकता. हे तुमच्या ठेवी रकमेच्या 80 ते 90 टक्के असू शकते. आरडीच्या मुदतपूर्तीवर मिळालेल्या व्याजावर कर आकारला जातो. उदाहरणार्थ, जर तुमच्या आरडीवरील व्याजाचे उत्पन्न 40,000 रुपयांपर्यंत (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50,000 रुपये) असल्यास, तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही आणि जर यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 10% टीडीएस (TDS) कापला जातो.
advertisement
एसआपी (SIP) ची गुंतवणूक कशी असते -
एसआयपीबद्दल बोलायचे झाले तर आरडीप्रमाणे, तुम्ही एसआयपीमध्ये छोट्या गुंतवणुक रकमेने सुरुवात करू शकता. परंतु एसआयपी ही बाजारात पैसे गुंतवले जात असल्याने त्याला आरडीप्रमाणे खात्रीशीर परतावा मिळण्याची खात्री देता येत नाही. मात्र, आज तरीही बहुतेक तज्ञ एसआयपीला संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानतात. म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर असल्यामुळे ते योग्य पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेल्या पैशांचे व्यवस्थापन करतात, यामुळे एसआयपीत गुंतवणुक करण्याचा धोका कमी झाला आहे.
advertisement
आरडीप्रमाणे तुम्ही काही कालावधीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये आरडीप्रमाणे कोणतेही लॉक इन पीरियडसारखे बंधन नसून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती थांबवू शकता आणि पैसे काढू शकता. परंतु जर तुम्हाला एसआयपीमधून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही तो दीर्घकाळ चालू ठेवणे आवश्यक असून असे केल्यामुळे तुम्हाला याच्या चक्रवाढीचा फायदा आहे आणि दीर्घकाळात लवकर संपत्ती निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
तज्ञांच्या मते, एसआयपीमध्ये सरासरी परतावा सुमारे 12 टक्के आहे. कधीकधी ते यापेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत पाहिले तर हा परतावा आरडीपेक्षा खूप जास्त आहे. दीर्घकालीन एसआयपीद्वारे तुम्ही चांगला फंड तयार करू शकता.
एसआयपीमध्ये तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. याचा अर्थ असा की जर, बाजार घसरत असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला जास्त युनिट्सचे वाटप केले जाईल आणि जर मार्केट तेजीत असेल तर तुम्हाला कमी युनिट्सचे वाटप केले जाईल. बाजार घसरला तरी तुमचे नुकसान होत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा बाजार वाढतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सरासरी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची संधी मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांशी संवाद साधा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 21, 2024 4:29 PM IST