घराच्या छतावर बसवा सोलर अन् मिळवा 78 हजार रुपयांचे अनुदान, काय आहे ही योजना?
- Reported by:Patel Irfan Hassan
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
suryaghar yojana marathi - या योजनेतील ग्राहकाच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास त्यांना मोफत वीज मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - केंद्र सरकारने ‘पंतप्रधान–सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. त्यात 3 किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेतील ग्राहकाच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास त्यांना मोफत वीज मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 6 हजार 341 घरगुती ग्राहकांनी अर्जाला मंजुरी मिळाली असून, 1 हजार 601 सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत होणार आहे.
घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे.
advertisement
Success Story : शिक्षण फक्त बारावी पास, पण सोलापुरचा पठ्ठ्या वर्षाला कमावतोय 6 लाख रुपये
प्रधानमंत्री घरकुल योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
घरावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्यासाठी घरगुती आणि गृहसंकुल ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोदणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी लोकल18 शी बोलताना केले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Oct 20, 2024 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
घराच्या छतावर बसवा सोलर अन् मिळवा 78 हजार रुपयांचे अनुदान, काय आहे ही योजना?








