Success Story : शिक्षण फक्त बारावी पास, पण सोलापुरचा पठ्ठ्या वर्षाला कमावतोय 6 लाख रुपये
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
solapur farmer success story - विशाल ज्ञानेश्वर लेंगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील वडजी गावातील रहिवासी आहेत. विशाल ज्ञानेश्वर लेंगरे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - सध्या शेतकरी शेतात विविध प्रयोग करुन चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवत आहेत. आज अशाच एका शेतकऱ्याबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी पाकळी गुलाब लागवडीतून वर्षाला खर्च वजा जाता 6 लाखांची कमाई केली आहे.
विशाल ज्ञानेश्वर लेंगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील वडजी गावातील रहिवासी आहेत. विशाल ज्ञानेश्वर लेंगरे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते मागील 8 ते 10 वर्षापासुन फूलशेती करत असून अर्धा एकर शेतामध्ये त्यांनी 5 हजार पाकळी गुलाबाची रोप लावलेली असून या फुल शेतीतून ते वार्षिक 6 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
एकदा या पाकळी गुलाब रोपांची लागवड केल्यानंतर 5 ते 6 वर्षे यापासुन फुल येतात. फुल शेतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक छोट्या-मोठ्या समारंभापासून तर लग्नकार्यापर्यंत फुलांचा वापर आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच बरेच सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे आता फुलांना बाजारपेठेत मागणी वर्षभर टिकून राहते व शेतकऱ्यांना देखील यामुळे चांगला बाजार भाव मिळतो, असे त्यांनी सांगितली.
advertisement
या पाकळी गुलाबाची काढणी 2 दिवसानंतर केली जाते व एकावेळी त्यांना 20 ते 30 किलो गुलाबाचे उत्पादन मिळते. दोन मजुरांच्या मदतीने गुलाबाच्या फुलांची काढणी केली जाते. तोडणी झाल्यानंतर विक्रीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पाठविली जाते. या पाकळी गुलाबाचा वापर गुलकंद बनवण्यासाठीही केला जातो.
advertisement
तीन वर्षात आतापर्यंत 50 ते 60 गुलाबाच्या तोडण्या त्यांनी केलेल्या आहेत. तसेच सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात भाव मिळतो. त्यामुळे एकूण वर्षाला ते पाकळी गुलाब लागवडीतून खर्च वजा जाता 6 लाखांचे उत्पन्न घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 20, 2024 2:23 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शिक्षण फक्त बारावी पास, पण सोलापुरचा पठ्ठ्या वर्षाला कमावतोय 6 लाख रुपये