बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नेमके काय उपाय केले जातात, संपर्ण माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
child marriage - लग्नसराई सुरू झाल्यावर बालविवाह रोखणे हा प्रशासनासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाने अनेक उपाययोजना तयार केल्या आहेत. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी हा सण आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. दिवाळी झाल्यावर लग्नसराई सुरू होते. दिवाळीनंतर लग्नासाठी अनेक मुहूर्त असतात. मात्र, लग्नसराई सुरू झाल्यावर बालविवाह रोखणे हा प्रशासनासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाने अनेक उपाययोजना तयार केल्या आहेत. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
जि. प. महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आता दिवाळीनंतर लग्नाचे खूप असे मुहूर्त आहेत. सध्या ग्रामीण भागामध्ये त्यासोबत शहरी भागामध्येही बालविवाहाचे प्रमाण हे वाढत चालले आहे. यामागे वेगवेगळी कारणेही आहेत. अनेकांची आर्थिक अडचण असते किंवा इतरही अडचणी असतात. त्यामुळेही हे बालविवाह होतात. पण हे बालविवाह रोखण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना या आपल्या आहेत. आमची संपूर्ण टीम ही यासाठी कामाला लागली आहे.
advertisement
बालविवाह रोखण्यासाठीच्या टिप्स -
आम्ही जे मंगल कार्यालय आहे किंवा जे लॉन्स आहे या ठिकाणी जाऊन विचारपूस करत आहोत. तुमच्याकडे किती लग्नाच्या बुकिंग आहेत, त्यामध्ये तुम्ही सर्व कागदपत्रे तपासून घेताय का, जन्म दाखला घेताय का? जर तुम्ही दाखला घेत नसाल तर तुम्ही तो घ्यावा आणि जर यामध्ये तुम्हाला कुठे अल्पवयीन मुलगी आढळली तर त्वरित तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर कासार, ब्युटी पार्लर, पंडितजी, आचारी या सर्व लोकांशी आम्ही संपर्क करत आहोत आणि जर तुम्हाला कुठे बालविवाह होताना आढळला तर तुम्ही आम्हाला सांगावे, असे त्यांना सांगत आहोत.
advertisement
त्यासोबत यासाठी आम्ही दामिनी पथक, ग्रामपंचायत, आशा सेविका तसेच ज्या बालविवाह रोखण्यासाठीच्या सामाजिक संस्था आहेत, या सगळ्यांची मदत घेतलेली आहे. 1098 हा आमचा हेल्पलाइन नंबर आहे. कुठे बालविवाह होणार असेल, तर तुम्ही यावर संपर्क साधून सांगू शकता.
त्या ठिकाणी आम्ही येऊन तो विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करू आणि जर बालविवाह केला तर तुम्हाला यामध्ये शिक्षा देखील घेऊ शकते, असे मुलगा आणि मुलीचे आई-वडील आहेत त्यांना आम्ही समजावून सांगणार आहोत, अशी माहितीही जि. प. महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 20, 2024 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नेमके काय उपाय केले जातात, संपर्ण माहिती