सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, काही गणेश मंडळं अनधिकृतरीत्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिसतात. अशा मंडळांमुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करणाऱ्या पोलीस दलावर ताण येतो. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच श्रींची प्रतिष्ठापना करावी. परवानगी घेताना अडचणी आल्यास संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधवा, असं आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आलं आहे.
advertisement
"जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस दलाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी. गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. ज्या व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल," असं पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले.
Ganeshotsav 2025: गणपती विसर्जन मिरवणूक 4 तासांत उरकणार, पुण्यातील मंडळांचा मोठा निर्णय
कसा कराल अर्ज ?
नोंदणी करताना सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx ही लिंक ओपन करावी. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड क्रिएट करावा. ही प्रक्रिया झाल्यानंतर लॉगिन आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करावे. लॉगिन झाल्यानंतर सिटीझन सर्व्हिसेस ऑप्शनमध्ये जाऊन गणेश फेस्टिव्हल परमिशन अॅप्लिकेशन पर्यायावर क्लिक करावं. तिथे मंडळाची संपूर्ण माहिती भरावी, असं आवाहन पोलीस दलाने केलं आहे.
ऑनलाइन अर्ज करताना मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता, मंडप उभारण्याचे ठिकाण, तारीख व वेळ, मिरवणुकीचा मार्ग, वेळ आणि आयोजनाचे तपशील, ध्वनिवर्धक प्रणालीच्या वापराची माहिती, उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीचे नाव, ओळखपत्र व संपर्क क्रमांक, कायद्याचे पालन करणारे घोषणापत्र, आपत्कालीन व्यवस्थापनाची आखणी इत्याही माहिती असणं गरजेचं आहे. पनवानगीशिवाय मंडप उभारण्यास, ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास आणि मिरवणूक काढण्यास मनाई आहे.






