वैदिक पंचांगानुसार, यावर्षी 8 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत असेल. सूर्योदयाची तारीख ग्राह्य धरली तर या वर्षी 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल.
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर गव्हाचं पीठ मळा आणि या पिठापासून नागदेवतेची मूर्ती बनवा. या मूर्तीला हळदी-कुंकू वाहून घराच्या दरवाजाबाहेर ठेवा. त्यावर फुलांचा हार, दूध आणि लाह्या अर्पण करा. धूप आणि अगरबत्ती लावून मूर्तीची पूजा करा. या पूजेनंतर घराजवळ असलेल्या मंदिरात नागेश्वर शिवलिंग असेल तर त्याची पूजा करावी. असं केल्याने व्यक्तीला कुंडलीतील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
advertisement
खूप दिवसांनी खुशखबर, धनलाभ! श्रावणातील विनायक चतुर्थी या राशींना शुभ फळदायी
या वेळी नागपंचमीच्या दिवशी, शुभ सिद्ध आणि साध्य हे दोन योग तयार होत आहेत. शंकरासोबत नागदेवतेची पूजा केल्याने रोग आणि अडथळे दूर होतील. नागदेवता शंकराला अतिशय प्रिय आहे. कारण, समुद्रमंथनातून निघालेलं विष प्राशन केल्यानंतर शंकराच्या गळ्याचा दाह नागदेवतेने थांबवला होता, असं मानलं जातं.
महाराष्ट्रातील गाव-खेड्यांमध्ये नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया वारूळाला जातात. तिथे जाऊन वारूळाची विधिवत पूजा करतात. काही ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास देखील केला जातो. हा उपवास नागपंचमीच्या दिवशी वारूळाची पूजा करून आल्यानंतर सोडला जातो.
'जिभेवर साखर' असलेली माणसं या राशींची असतात; वाणीतून हमखास छाप पाडतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
