पांढरे पदार्थ टाळण्यामागची मुख्य कारणे
नकारात्मक शक्तींचा प्रभाव
असे मानले जाते की, होळी आणि विशेषतः होलाष्टकाच्या काळात नकारात्मक ऊर्जा आणि आसुरी शक्तींचा प्रभाव अधिक असतो. पांढरा रंग हा सौम्य आणि शांततेचे प्रतीक असला तरी, तंत्रशास्त्रानुसार नकारात्मक शक्ती पांढऱ्या रंगाकडे लवकर आकर्षित होतात, होळीच्या दिवशी पांढरे पदार्थ जसे की, दूध, दही, तांदूळ, पांढरी मिठाई खाल्ल्याने नजर लागण्याची किंवा बाहेरील बाधा होण्याची शक्यता असते, अशी जुनी समजूत आहे.
advertisement
चंद्र आणि मानसिक स्थिती
पांढरा रंग हा चंद्राशी संबंधित आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. होळी फाल्गुन पौर्णिमाला येते, ज्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वोच्च असतो. ज्योतिषशात्रानुसार, या दिवशी पांढऱ्या रंगाच्या अतिसेवनाने मनाची चंचलता वाढू शकते किंवा भावनिक अस्थिरता येऊ शकते. म्हणूनच संतुलित राहण्यासाठी या दिवशी पांढरे पदार्थ टाळून रंगात मिसळले किंवा इतर रंगाचे पदार्थ खाल्ले जातात.
ऋतू बदल आणि आरोग्य
होळी हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा काळ आहे. या काळात शरीरात आजार वाढण्याची शक्यता असते. पांढरे पदार्थ जसे की दही किंवा थंड दूध कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे सर्दी, खोकला किंवा पचनाचे विकार होऊ शकतात. आधुनिक विज्ञानात साखर, मैदा आणि मीठ यांना 'व्हाईट पॉयझन' म्हटले जाते. होळीच्या दिवशी तळलेले आणि गोड पदार्थ जास्त खाल्ले जातात, अशा वेळी अतिरिक्त पांढऱ्या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
