अटॅच्ड बाथरूमची स्वच्छता -
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात एखाद्या खोलीला अटॅच्ड बाथरूम असेल तर ते अस्वच्छ ठेवू नका. वेळोवेळी ते स्वच्छ करत रहा. अस्वच्छतेनं घरात नकारात्मकता कायम राहील. तसेच, कुटुंबियांना झोपेच्या समस्या जाणवू शकतात. पती-पत्नीमधील नाते बिघडू शकते.
देखभालीची विशेष काळजी घ्या -
तुमच्या घरात अटॅच्ड बाथरूम असेल तर तुम्हाला त्याच्या देखभालीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणजे, टॉयलेट सीट तुटलेली किंवा घाणेरडी नसावी. तसेच, बाथरूमच्या नळाला गळती नसावी. बाथरूमचा दरवाजाही तुटलेला नसावा. जर असे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष वाढू शकतो. जीवनात नकारात्मकता येऊ शकते.
advertisement
30 वर्षांनी जवळ येणार शनी-शुक्र-सूर्य! या राशींना मिळणार अपार पैसा, प्रतिष्ठा
बाथरूम या दिशेला असावे -
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम दक्षिण किंवा ईशान्य कोपऱ्यात असेल तर ते चुकीचे आहे, वास्तुदोष उद्भवू शकतात. घराच्या पूर्वेला बाथरूम असणे चांगले मानले जाते. असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि सुख-समृद्धी टिकून राहते.
वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात -
तुमच्या बेडरूमला अटॅच्ड बाथरूम असेल तर तुम्ही बाथरूमकडे पाय करून झोपू नये. कारण असे केल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. तसेच, पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून भांडणे होतात, असे सांगितले जाते.
रिलेशनशीपमध्ये जास्त गुंतू लागलाय! या राशींना नंतर दूर होणं जमणार नाही
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)