एखाद्यावेळी घरात वीज गेली आणि अंधारात काही पडल्याचा आवाज आला, तर मनात शंकेची पाल चुकचुकते. कारण हे चांगले संकेत नसतात. कितीही विज्ञाननिष्ठ व्यक्ती असेल, तरी भूतकाळातल्या गोष्टींवर कोणाचं नियंत्रण नसतं. एखाद्या जागेत या आधी काही घडून गेलं असेल, तर त्याचा तिथं नव्यानं राहायला येणाऱ्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ती जागा बाधित आहे का हे ओळखण्यासाठी स्वतःच काही संकेत ओळखायला हवेत.
advertisement
घरातले लाईट्स चालू-बंद होत असतील, वीजेची उपकरणं आपोआप सुरू होत असतील किंवा बंद होत असतील किंवा काही उपकरणं विनाकारण बंद पडत असतील, तर काहीतरी गडबड आहे हे ओळखा. तिथे एखाद्या भुताचा वास असू शकतो.
घरात एखादी अस्पष्ट आकाराची आकृती दिसली, सावल्या दिसल्या तर निश्चितपणे ती जागा बाधित आहे, असं समजावं. काही वेळा घरात कोणी माणूस नसतानाही आपल्यावर कोणी लक्ष ठेवत असल्याचा भास होतो. आपल्या मागे कोणी येतंय असं वाटतं. अशा वेळी अस्वस्थ वाटतं. तसं झालं तर तिथे अदृष्य आत्मा असेल, असं समजावं.
नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेत या मंत्रांचा करा पाठ; संकटे टळतील, वाढेल संपत्ती
एखादं ठिकाण बाधित असल्याची आणखी एक खूण म्हणजे तिथून येणारा सुगंध किंवा दुर्गंध. एखाद्या ठिकाणी अचानक परफ्यूम, तंबाखू, अत्तर किंवा इतर कोणता विशिष्ट वास आला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
घरातल्या वस्तू तुम्ही जशा ठेवल्या होत्या तशा न राहता हलल्या असतील, आपोआप जागा बदलत असतील, तर ते कोणाच्या तरी प्रभावामुळे होतंय हे लक्षात घ्या. तसंच घरातल्या विशिष्ट ठिकाणी गार वाटत असेल, एकदम तापमान कमी होत असेल, तर तेही याच प्रभावामुळे असू शकतं.
तुमच्या जवळ कोणीही नसताना पावलांचे आवाज आले, कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला किंवा इतर काही आवाज आले, दारावर टकटक ऐकू आली तर ही जागा बाधित असल्याची खूण समजावी. नव्या वास्तूत राहायला जाताना किंवा फिरायला गेल्यावर असे काही अनुभव आले, तर त्यामागचे संकेत लक्षात घेणं जरूरीचं असतं.
या राशींच्या लोकांना दिवाळी भाग्य उजळवणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
