उज्जैन : हिन्दू धर्मात प्रत्येक तिथी आणि उपवासाचे वेगळे महत्त्व आहे. वर्षात 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असा 2 वेळा एकादशीचा उपवास केला जातो. एकादशीला जगाचे पालनहार भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केल्याने जातकाला शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पन्ना एकादशीचा उपवास केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पन्ना एकादशी म्हटले जाते. जर कुणाला एकादशीचा उपवास सुरू करायचा असेल तर ते या एकादशीपासून उपवास सुरू करू शकतात. कारण याच दिवसापासून एकादशीची सुरुवात झाली होती. यावेळी एकदशीला अनेक शुभ योग तयार होत आहे. याचबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
उज्जैनचे पंडित आनंद भारद्वाज यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, वैदिक पंचांगानुसार, यावेळी उत्पन्ना एकादशी तिथीची सुरुवात 25 नोव्हेंबरला रात्री 2 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. तर पुढच्या दिवशी 26 नोव्हेंबरला रात्री 1 वाजून 43 मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. एकादशी तिथीचा उदय हा 26 नोव्हेंबरला असल्याने उदया तिथीनुसार उत्पन्ना एकादशीचा उपवास 26 नोव्हेंबरला केला जाईल.
ज्योतिष शास्त्रानुसा, एकादशीला सर्वात आधी प्रीति योग तयार होत आहे. यानंतर आयुष्मान योग आणि शिववास योगही तयार होत आहे. यामध्ये लक्ष्मी नारायणाची पूजेचे विशेष महत्त्व आहे. देव भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतो. तसेच यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी येते.
प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी तिथीला मुर राक्षस योग निद्रेत लीन भगवान विष्णुवर हल्ला करणार होता. त्यावेळी एकादशी देवी प्रकट झाली आणि तिने मुरसोबत युद्ध केले आणि त्याचा वध केला.
यादिवशी एकादशी देवीची उत्पत्ती झाली. या कारणाने एकादशीला उत्पन्ना एकदसी म्हटले जाते. ज्या कुणाला एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे, ते उत्पन्ना एकादशीपासून एकादशीचा उपवास करू शकतात. भगवान विष्णुच्या कृपेने पाप मिटतात आणि जीवनाच्या शेवटी त्यांच्या श्रीचरणी स्थान मिळते.
एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून अंघोळ करुन उपवासाचा संकल्प घ्यावा. पिवळा रंग भगवान श्रीहरिचा प्रिय रंग आहे. त्यामुळे पूजेदरम्यान, भगवान विष्णुला पिवळी मिठाईचा नैवेद्य द्यावा. भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करा. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही पूजारी, ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
