इतरांच्या लग्नाचे निमंत्रण येतंय, पण स्वत:चं होत नाहीये, प्रभू श्रीराम अन् सीता मातेची होणार कृपा, फक्त करा हा उपाय

Last Updated:

marriage remedies - अनेकांच्या लग्नात अनेक अडचणी येतात. लग्न जुळवतानाही विविध प्रकारच्या समस्या येतात. नेमके काय करावे, असा प्रश्न यामुळे घरातील लोकांना पडतो. अशा वेळी एक उपाय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी तुम्ही विधीनुसार पूजा केली तर तुमच्या लग्नाची समस्या नक्कीची मिटेल. नेमका काय आहे हा उपाय, तसेच हा उपाय कधी करावा, हे जाणून घेऊयात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
अनेकांच्या लग्नात अनेक अडचणी येतात. लग्न जुळवतानाही विविध प्रकारच्या समस्या येतात. नेमके काय करावे, असा प्रश्न यामुळे घरातील लोकांना पडतो. अशा वेळी एक उपाय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी तुम्ही विधीनुसार पूजा केली तर तुमच्या लग्नाची समस्या नक्कीची मिटेल. नेमका काय आहे हा उपाय, तसेच हा उपाय कधी करावा, हे जाणून घेऊयात.
हिंदू धर्मात कार्तिक महिना हा भगवान रामाच्या पूजेसाठी सर्वात शुभ महिना मानला जातो. पुराणांनुसार, भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला झाला होता. याला विवाह पंचमी असे म्हणतात. भगवान राम आणि सीता मातेच्या लग्नाचा दिवस असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी विवाह पंचमी ही 6 डिसेंबर रोजी साजरा केली जाईल.
advertisement
विवाह पंचमीला देवी देवता विवाह उत्सव साजरा करतात. या दिवशी अनेक मंदिरांमध्ये सीता राम कल्याण वैपवमचे आयोजन केले जाते. उत्तर भारतातही या दिनाचे विशेष महत्त्व असून हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या मुलांचे लग्न करतात.
या वर्षी विवाह पंचमी ही 5 डिसेंबरला दुपारी 12.49 ला सुरू होईल आणि 6 डिसेंबरला दुपारी 12.07 वाजता समाप्त होईल. उदया तिथीच्या आधारावर विवाह पंचमी साजरा केली जाईल.
advertisement
विवाह पंचमीला पूजा आणि उपवास केल्याने विवाहात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. तसेच या दिवशी विशेष रुपाने राम आणि सीता मातेची पूजा केल्याने जीवनसाथीचे सुख मिळेल. तसेच तुमचे आयुष्य समृद्ध होईल. या दिवशी जे लोक विवाह करतात त्या दिवशी राम आणि सीतेप्रमाणे प्रेम आणि सन्मानासह ते दाम्पत्य आपले आयुष्य जगते, असे मानले जातो.
advertisement
या दिवशी विवाह समारंभ आयोजित करण्याची एक परंपरा राहिली आहे. या दिवशी तुम्ही उपवास केला, राम-सीता मातेची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि तुमचे आयुष्य आनंदात जाते, असे सांगतात.
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही पूजारी, ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
इतरांच्या लग्नाचे निमंत्रण येतंय, पण स्वत:चं होत नाहीये, प्रभू श्रीराम अन् सीता मातेची होणार कृपा, फक्त करा हा उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement