तेल की तूप, नेमका कशाचा दिवा लावावा, चूक करू नका, योग्य पद्धत फॉलो केल्यावर होईल मोठा फायदा

Last Updated:

हिंदू धर्मात देवासमोर सकाळ, संध्याकाळ दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. पण दिवा नेमका कसा लावावा, दिवा लावताना कोणत्या तेलाचा वापर करावा, त्याचे महत्त्व काय आहे, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
हिंदू धर्मात देवासमोर सकाळ, संध्याकाळ दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. पण दिवा नेमका कसा लावावा, दिवा लावताना कोणत्या तेलाचा वापर करावा, त्याचे महत्त्व काय आहे, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चित्तूर जिल्ह्यातील पुजारी श्रीनिवास स्वामी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, दिवा हे आत्म्याचे प्रतीक आणि ईश्वराचे रूप मानले जात असल्याने देवाची पूजा करण्यापूर्वी दिवा लावला जातो. तसेच हिंदू परंपरेनुसार, दिवा लावून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे पवित्र मानले जाते.
दिवा लावण्याचे फायदे -
ज्याठिकाणी रोज दिवा लावला जातो, त्याठिकाणी सुख-समृद्धि, ज्ञानाचा विकास होतो. तसेच कोणतीही वाईट घटना घडत नाही. दोन पणत्यांमध्ये दीप पूजा करावी. एका पणतीत गाईचे तूप आणि दुसऱ्या पणतीत तिळाचे तेल टाकून दिवा लावावा. असे केल्याने शुभ फळ मिळते.
advertisement
दिव्यात कोणत्या तेलाचा उपयोग करावा -
बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. मात्र, हिंदू परंपरेनुसार, दीप पुजेसाठी गायीचे तूप आणि तिळाचे तेल सर्वात उत्तम मानले जाते. तसेच दिवा लावताना एक वाती नव्हे तर कमीत कमी दोन वाती लावाव्यात. तसेच पुरुषांनी दिवा लावताना तीन वातींचा वापर करावा. असे करणे अधिक शुभ राहील. तर महिनांनी एका पणतीमध्ये 5 वाती आणि दुसऱ्या पणतीमध्ये 5 वाती अशा एकूण 10 वाती लावणे शुभ असते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
दिवा लावण्याची दिशा आणि महत्त्व -
दिव्याला उत्तर दिशेने लावल्याने आर्थिक लाभ होतो. तर पूर्व दिशेत लावल्याने मानसन्मान, प्रतिष्ठा वाढते, अशी माहिती श्रीनिवास स्वामी यांनी दिली. तसेच ज्या घरात दररोज दिवा लागतो, त्याठिकाणी चांगले फळ मिळते आणि लक्ष्मीचा वास होतो. तसेच दिवा लावून देवाची पूजा केल्याने भाविकांची भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
advertisement
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही पूजारी, ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तेल की तूप, नेमका कशाचा दिवा लावावा, चूक करू नका, योग्य पद्धत फॉलो केल्यावर होईल मोठा फायदा
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement