ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रह स्त्रियांशी संबंधित आहे. या ग्रहाच्या दुर्बलतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. शुक्र ग्रह हा सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जातो. व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर त्याचा थेट प्रभाव तुमच्या रंगावर दिसून येतो. कुंडलीत हा ग्रह जितका प्रभावशाली असेल तितका तो व्यक्ती अधिक आकर्षक दिसतो.
शुक्र अशक्त झाल्यास -
advertisement
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र क्षीण असल्यास त्याच्या शरीरातील काही बाह्य लक्षणे पाहूनच ओळखता येते.
शुक्र क्षीण झाल्यामुळे चेहऱ्यावर अचानक मुरुमे दिसू लागतात.
-चेहऱ्याच्या त्वचेवर अचानक इन्फेक्शन होणे हे देखील तुमचा शुक्र कमकुवत होण्याचे लक्षण आहे.
- केस अचानक गळायला लागले तर तुम्ही तुमची कुंडली एकदा नक्की पहा. कारण कधी कधी शुक्राच्या कमकुवतपणामुळे असे होऊ शकते.
- केसांची चमक कमी होण्यासोबतच उवा होणे हे देखील तुमचा शुक्र ग्रह कमजोर होण्याचे कारण असू शकते. केस अकाली पांढरे होणे देखील हेच सूचित करते.
याशिवाय त्वचेवर पुरळ उठणे, रंग गडद होणे हे शुक्राच्या कमकुवतपणामुळे देखील होऊ शकते.
शुक्र बलवान - अंकशास्त्रानुसार, प्रत्येकाचा एक जन्मांक असतो. 6 जन्मांकाचा स्वामी शुक्र आहे. 6 जन्मांकावर जन्मलेले लोक दिसायला आकर्षक असतात. विशेषतःआपण महिलांबद्दल बोललो तर 6 क्रमांकावर जन्मलेल्या महिला दिसायला खूप सुंदर असतात. प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होतो. शुक्राची कमजोरी महिलांसाठी त्रासदायक ठरू शकते.
भाग्योदय जवळ आलाय! शनिअस्ताने या राशींच्या जीवनात नवी पहाट; प्रयत्न सक्सेस
शुक्र मजबूत करण्याचे उपाय -
सूर्यमालेतील शुक्र हा तेजस्वी ग्रह मानला जातो. म्हणून, हा ग्रह मजबूत करण्यासाठी, चमकदार कपडे घाला आणि काही चमकदार उपकरणे वापरा.
-शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सेवन करावे. कारण पांढऱ्या रंगाच्या वस्तू शुक्रावर परिणाम करतात. शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूही दान करू शकता.
-शुक्र ग्रहाला बल देण्यासाठी व्यक्तीने हिऱ्याची अंगठी धारण करावी. ती घालण्यासाठी पंडितजींकडून योग्य वेळ विचारावी.
- शुक्र ग्रहाला बलवान बनवण्यासाठी दररोज पांढऱ्या गाईला चारा खायला देऊन त्याचा कोप टाळू शकता.
- यासोबत तुम्ही चांदीचे किंवा प्लॅटिनमचे कोणतेही दागिने घालू शकता. यामुळे तुमची समस्या दूर होईल.
खुर्चीवर बसल्या-बसल्या पाय हलवण्याची सवय अतिशय बेक्कार; इतक्या गोष्टींवर परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)