फरीदाबाद : यंदाच्या वर्षी अक्षय तृतीयेचा सण हा 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे. पंचागानुसार, सकाळी 4.17 वाजेपासून वैशाख शुक्ल तृतीया तिथी सुरू होईल. तसेच 11 मे शनिवारी 2.50 वाजेला समाप्त होईल. याबाबत पंडित नंदलाल शर्मा यांनी विशेष माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी अक्षय तृतीयेला लक्ष्मी पूजेचा सुंदर योग तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी अक्षय तृतीया 10 मे म्हणजे शुक्रवारी आहे.
advertisement
आश्चर्यम…महिलेचं वय 20, एकाच वेळी दिला 5 मुलींना जन्म, अनेकांना विश्वासच बसेना!
या दिवशी पुण्य केले संपत नाही -
पंडित नंदलाल शर्मा यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, अक्षय तृतीयेचा सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात साजरा केला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया किंवा महाराष्ट्रातील खान्देशात आखाजी या नावानेही ओळखले जाते.
या दिवशी तुम्ही जे काही पुण्य कर्म करतात, त्यादिवशी केले पुण्य कधीच संपत नाही. ते सदैव तुमच्यासोबत काय असते. असेही म्हटले जाते की, अक्षय तृतीयेला जे लोक पाप करतात, त्याचेही फळ पूर्ण आयुष्यभर कायम असते. कारण तेसुद्धा अक्षय असते. त्यामुळे अक्षय तृतीयेला कोणतेही चुकीचे काम करू नये.
कोणत्याही कोचिंगविना मिळवलं मोठं यश, सेकंड इअरचा विद्यार्थी होणार सैन्यदलात लेफ्टनंट
यादिवशी पूजा करणे खूपच शुभ -
अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. शास्त्रांच्या मते, या दिवशी भगवान विष्णुचे परशुराम अवतार यांचा जन्म झाला होता. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला अक्षय पात्र दिले होते. यामध्ये कधीही भोजन समाप्त होत नव्हते. या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. तसेच या दिवसाला शास्त्रात अबूझ मुहूर्त असे म्हटले आहे. म्हणजे या दिवशी विवाह, गृहप्रवेश, वाहन खरेदी, साखरपुडा किंवा इतर शुभ काम केले जाते. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ, दक्षिणावर्ती शंख आणि पारद शिवलिंग खरेदी करुन घरी आणणे खूपच शुभ मानले गेले आहे.
सूचना - ही माहिती ज्योतिषी, पंडितांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.