जमुई : डिसेंबर महिन्यापासून लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी लग्नाच्या तयारीची गडबड सुरू असेल. परंतु सध्या खरमास असल्याने या लग्नसराईला जरा ब्रेक लागला आहे. आता 15 जानेवारीला मकर संक्रांतीनंतर सूर्य धनू राशीतून बाहेर येईल आणि त्यासह खरमासही संपेल. हिंदू धर्मात या मासात कोणतंही शुभकार्य केलं जात नाही.
16 डिसेंबरला सूर्याचा धनू राशीत प्रवेश झाला होता. त्यामुळे आता एका महिन्यानंतर सूर्य धनू राशीतून बाहेर येईल. ज्योतिषी पंडित मनोहर आचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरमास संपल्यानंतर लग्नासाठी अनेक मुहूर्त आहेत. जानेवारी महिन्यातच 10 शुभ मुहूर्त आहेत. तर, फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 15 आणि मार्च महिन्यात केवळ पाचच मुहूर्त आहेत.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्चला पुन्हा एकदा सूर्याचं राशीपरिवर्तन होईल आणि पुढील महिनाभर खरमास असेल. त्यानंतर मग 18 एप्रिलपासून लग्नसराई सुरू होईल. म्हणजेच 13 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत खरमास असल्यामुळे लग्न करता येणार नाही.
Numerology: प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
लग्नासाठी कधी आहेत शुभ मुहूर्त?
खरमास संपताच जानेवारी महिन्यात 16, 17, 18, 20, 21, 22, 27, 28, 30 आणि 31 तारखेला विवाहासाठी चांगला मुहूर्त आहे. फेब्रुवारीमध्ये 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 12, 13, 18, 19, 24, 25, 26 आणि 27 तारखेला शुभ कार्य पार पडू शकतात. तर मार्चमध्ये खरमास सुरू होण्यापूर्वी 2, 4, 6, 7 आणि 11 तारखेला आपण शुभ मुहूर्तावर लग्न करू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g