देवघर - प्रत्येकाची कुंडली ही त्याच्या जन्माची वेळी असलेल्या ग्रह नक्षत्रांच्या आधारावर बनवली जाते. तसेच ज्योतिषी शास्त्रानुसार जीवनात होणाऱ्या चांगल्या वाईट प्रभावांमागे ग्रह नक्षत्रांचे महत्त्वपूर्ण कारण असते. शनिला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. त्यामुळे जेव्हा एखाद्याच्या कुंडलीत शनिची महादशा असते, तेव्हा चांगली वेळही वाईट वेळेत बदलते. या दरम्यान व्यक्तीला कधी कधी शनीची साडेसाती, शनिढैय्या किंवा अंतरदशा यांना सामोरे जावे लागते. जर एखाद्या व्यक्तीला शनीच्या महादशेला सामोरे जावे लागले तर त्याच्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शनिच्या महादशेची लक्षणे आणि उपाय काय आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शनि हा सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी शनिच्या महादशेला सामोरे जावेच लागते आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या व्यवसाय, करिअर आणि सामाजिक जीवनावर होतो.
शनिच्या महादशेची लक्षणे -
तुमच्या वस्तू वारंवार हरवत असेल, घरामध्ये सतत भांडणे होत असतील, तुम्ही मानसिक तणावाखाली असाल, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा वारंवार राग येत असेल, व्यवसायात वारंवार नुकसान होत असेल, महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील, लग्न करण्यासाठी किंवा लग्नात अडथळे येत असतील तर ही सर्व शनीच्या महादशाची लक्षणे असू शकतात, असे त्यांनी सांगितले.
परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन, पण सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली...
शनिच्या महादशेपासून बचाव करण्याचे उपाय -
ज्योतिषाचार्य यांनी याबाबत सांगितले की, शनिच्या महादशेपासून बचाव करण्याचे अनेक उपाय आहेत. शनिच्या मंदिरात पूजा आणि आराधना करावी. तसेच त्याठिकाणी दिवा लावणे फायदेमंद मानले जाते. याशिवाय पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी तिळाच्या तेलाच्या दिवा आवर्जून लावावा. प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. चोला अर्पण करावा. तसेच हनुमान चालीसाचे पठण करावे. कारण हनुमान जी यांच्या भक्तांवर शनिची कुदृष्टी पडत नाही, असेही त्यांनी सांगितले.
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.