परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन, पण सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
job scam - जर कोणी तुम्हाला परदेशात नोकरी आणि मोठा पगार देण्याचे आश्वासन देत असेल तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे.
हैदराबाद : अनेकदा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूक केली जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मात्र, यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणा राज्यातील जगित्याला जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी 4 तरुणांना एका टोळीने फसवणूक केली.
सिंगारोपेट येथील एका व्यक्ती या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. त्याने या 4 तरुणांना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने प्रत्येकाकडून दीड लाख रुपये घेतले. तसेच प्रत्येक महिन्याला 40 हजार मिळणार असल्याचे सांगितले. त्याच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन चारही तरुणांनी या प्रस्तावावर होकार दिला आणि व्हिजिट व्हिसावपर बँकॉक जायला तयार झाले.
advertisement
मात्र, बँकॉक पोहोचल्यावर आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्याठिकाणी तेथे उभा असलेला व्यक्ती फोन वर संपर्क करू शकला नाही. यानंतर त्यांना लक्षात आले की, आपल्याला धोका दिला गेला आहे. यानंतर त्यांनी आपल्या खर्चानेच लाओस जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, जेव्हा ते लाओस पोहोचले, तेव्हा सर्व सत्य प्रकार त्यांच्यासमोर आला.
advertisement
गर्लफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये गेला गेला प्रियकर, मित्रांनी ‘ती’ अट ठेवत केलं ब्लॅकमेल, पुढे काय घडलं?
याठिकाणी कोणतीही कंपनी नाही तर सायबर क्राइममधून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे त्यांना लाओसमध्ये समजले. त्यांना सांगण्यात आले की, अमेरिकेच्या लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांना मुलींच्या फोटोसोबत त्यांना चॅट करावी लागेल. मात्र, जेव्हा त्यांनी या कामासाठी नकार दिला तर तेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात झाली. नर्कयातनेसारखा हा अनुभव होता.
advertisement
मात्र, लाओसमधील काही स्थानिक तरुणांनी त्यांची मदत केली आणि कसेतरी तेथून पळून गेले आणि गोंधळाच्या स्थितीत ते भारतात परतण्यात यशस्वी झाले. परतल्यानंतर या तरुणांनी तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरोकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. म्हणून जर कोणी तुम्हाला परदेशात नोकरी आणि मोठा पगार देण्याचे आश्वासन देत असेल तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.
Location :
Telangana
First Published :
November 11, 2024 5:55 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन, पण सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली...