गर्लफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये गेला गेला प्रियकर, मित्रांनी 'ती' अट ठेवत केलं ब्लॅकमेल, पुढे काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - अंकित नवाचा तरुण आपल्या प्रेयसीसह चाउमीन खायला पोहोचला होता. याठिकाणी आधीपासून असलेल्या त्याच्या 3 मित्रांनी त्याला ब्लॅकमेल केले. तसेच त्याला मारहाणही केली.
नोएडा : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रियकराने प्रेयसीला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाउमीन खाताना ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडला आहे.
अंकित नवाचा तरुण आपल्या प्रेयसीसह चाउमीन खायला पोहोचला होता. याठिकाणी आधीपासून असलेल्या त्याच्या 3 मित्रांनी त्याला ब्लॅकमेल केले. तसेच त्याला मारहाणही केली. नोएडाच्या सेक्टर-45 मध्ये सोम बाजारात ही घटना घडली. 6 नोव्हेंबरला ही घटना घडली असे सांगितले जात आहे.
याप्रकरणी अंकितचा भाऊ बृजमोहन याने सेक्टर 39 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले की, करण, कल्लू उर्फ अमित आणि प्रदीप नावाच्या 3 तरुणांनी अमित आणि त्याच्या प्रेयसीचे फोटो काढले. त्यानंतर त्याला घेरले आणि त्याला आधी शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला चाउमिन खाऊ घाल किंवा दुसरी कोणती पार्टी थे नाहीतर आम्ही तुझ्या प्रेयसीबाबत तुझ्या कुटुंबीयांना सांगू, अशी धमकी दिली.
advertisement
यावर अंकितने विरोध केला असता आरोपींनी त्याला मारहाण सुरू केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. या घटेनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच स्थानिकांनीही आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे बृजमोहन यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तिनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Location :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
November 11, 2024 3:32 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
गर्लफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये गेला गेला प्रियकर, मित्रांनी 'ती' अट ठेवत केलं ब्लॅकमेल, पुढे काय घडलं?