महाभारत काळात पांडवांच्या विजयासाठी माता कालीला प्रसन्न करावं लागलं, त्यासाठी मानवी बलिदान द्यावं लागलं. मानवी बलिदानासाठी एका राजकुमाराची आवश्यकता होती. परंतु मानवी बलिदानासाठी कोणताही राजकुमार पुढे आला नाही, त्यानंतर अर्जुनचा मुलगा इरावण स्वतः मानवी बलिदानासाठी पुढे आला. परंतु मानवी बलिदानापूर्वी इरावणने सर्वांसमोर एक अट ठेवली.
advertisement
इरावन म्हणतो की त्याला अविवाहित मरायचं नाही, म्हणून तो मानवी बलिदानाच्या आधी लग्न करू इच्छितो. इरावनची ही अट ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण कोणताही राजा आपल्या मुलीचं लग्न मरणासन्न व्यक्तीशी कस करू शकतो. कोणताही राजा या अटीवर आपल्या मुलीचं लग्न करण्यास तयार नव्हता.
जेव्हा कोणताही उपाय सापडला नाही तेव्हा श्रीकृष्णाने होकार दिला आणि मोहिनीचं रूप धारण करत त्याने इरावनशी लग्न केलं. यामुळे इरावनची अट पूर्ण झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःच्या हातांनी माता कालीच्या चरणी आपलं डोकं अर्पण केलं.
Mahabharat : एकमेकांचे व्याही होते कृष्ण आणि दुर्योधन, तरी दोघांचं कधीच जमलं का नाही?
इरावनच्या मृत्युनंतर श्रीकृष्णाने मोहिनीच्या रूपात बराच काळ शोक केला. तेव्हापासून किन्नर लोक इरावनला आपला देव मानतात आणि त्याची पूजा करतात. परंपरेनुसार किन्नर एक रात्र इरावनशी लग्न करतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी शोक करतात आणि विधवा होतात. तामिळनाडूतील कुवागम इथं इरावनचं एक प्राचीन मंदिर देखील आहे, जिथं इरावन देवतेच्या डोक्याची पूजा केली जाते.