TRENDING:

Mahabharat : मृत झाला होता राजा, राणीने ठेवले संबंध, 7 मुलांचा जन्म; विज्ञानही म्हणतं शक्य आहे

Last Updated:

Mahabharat Story : महाभारतातातील जन्माच्या कथा खूपच विचित्र आहे. अशाच कथेपैकी एक एका तेजस्वी राजाची कहाणी. ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राणीला पुत्रप्राप्तीसाठी त्याच्या मृतदेहाशी एकरूप व्हावं लागले, ज्याच्यापासून तिनं सात पुत्रांना जन्म दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : महाभारताच्या काळात एक राजा होता, ज्याचं नाव व्युषिताश्व. महाभारतात व्युषिताश्वाचे वर्णन नीतिमान राजा म्हणून केलं आहे. असं म्हटलं जातं की त्याने एक महान यज्ञ केला, ज्यासाठी सर्व आकाशीय देव इंद्राच्या नेतृत्वाखाली आले. या यज्ञानंतर व्युषिताश्वाला महान शक्ती प्राप्त झाली. त्याने अश्वमेध सोहळ्याद्वारे सर्व दिशांनी राज्ये जिंकली आणि आपली बहुतेक संपत्ती ब्राह्मणांना दान केली.
News18
News18
advertisement

पेंग्विनने प्रकाशित केलेल्या “ महाभारत: खंड 1” च्या पृष्ठ 148 वर राजा व्युषिताश्व बद्दल माहिती देण्यात आली आहे . कौशिकी पुस्तकांच्या " महाभारत आदि पर्व इंग्रजी भाग 2" मध्ये देखील याचा उल्लेख आहे . त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो निपुत्रिक होता. मग राणी मृत राजाला भेटली आणि अनेक पुत्रांना जन्म दिला.

advertisement

Mahabharat : वाईट होता दुर्योधन, तरी त्याच्या मृत्यूनंतर देवतांनी त्याच्यावर उधळली होती फुलं, पण का?

राजा व्युषिताश्व चंद्र वंशाचा राजा शंखान याचा मुलगा होता. व्युषिताश्वने राजा काक्षीवताची कन्या भद्रा हिच्याशी विवाह केला. राणी भद्रा ही त्या काळी भारतातील सर्वात सुंदर स्त्री मानली जात होती. भद्रावर व्युषिताश्वचं खूप प्रेम होतं. त्यांना मूलबाळ नव्हते. तो क्षयरोगाने मरण पावला, भद्रा शोकग्रस्त झाली. भद्राने राजाच्या मृतदेहाला मिठी मारली आणि बराच वेळ रडत होती.  पतीसोबत ती सती जाणार होती पण तिला तिच्या मृत पतीचा आवाज आला.

advertisement

राणीला राजाच्या मृतदेहासोबत संबंध ठेवण्याचे संकेत

शरीराबाहेर असलेला व्युषिताश्वाचा आत्मा भद्राला म्हणाला, “माझ्या प्रिये. तुझ्या मासिक पाळीच्या आठव्या किंवा चौदाव्या दिवशी तुझ्या पलंगावर माझ्याबरोबर झोप. मी तुला मुलगा देईन.”

आकाशवाणीने तिला राजाच्या मृतदेहासोबत झोपण्याचे संकेत दिले. त्याने जे करायला सांगितलं होतं ते तिनं केलं. त्या संभोगातून भद्राला तीन शतव आणि चार मद्रा असे सात पुत्र झाले.

advertisement

विज्ञान काय म्हणतं?

एका अभ्यासादरम्यान मिळालेल्या पुराव्याच्या आधारे, शास्त्रज्ञांच्या एका टीमने असा दावा केला आहे की 'एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या 48 तासांनंतर त्याच्या शुक्राणूंचा वापर गर्भधारणेसाठी केला जाऊ शकतो आणि त्यातून निरोगी मुले जन्माला येऊ शकतात'.

Mahabharat : आधी शरीराला यायचा माशाचा वास, मग पांडवांची पणजी सत्यवती सुगंधित कशी झाली?

advertisement

हा अभ्यास 'जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स' मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की 'एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शुक्राणू स्पर्म बँकेतही जमा केले जाऊ शकतात'

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मृत्यूच्या 48 तासांच्या आत मृत शरीरातून दोन प्रकारे शुक्राणू काढले जाऊ शकतात, ज्यामध्ये शस्त्रक्रियेच्या मदतीने मृत शरीरातून शुक्राणू काढून टाकणे समाविष्ट आहे. नंतर ते फ्रीजमध्ये ठेवता येतात.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : मृत झाला होता राजा, राणीने ठेवले संबंध, 7 मुलांचा जन्म; विज्ञानही म्हणतं शक्य आहे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल